आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हिसलब्लोअरच्या आराेपांना पुष्टी देणारा पुरावा अद्याप नाही : इन्फोसिसचे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरु - व्हिसलब्लाेअर आराेपांच्या समर्थनार्थ आता पर्यंत काेणताही पुरावा मिळालेला नाही. तपास पूर्ण झाल्यानंतर तथ्य जाणून घेण्यात येतील असे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेल्या इन्फाेसिस या कंपनीने साेमवारी राष्ट्रीय शेअर बाजाराला सांगितले. शेअर बाजाराच्या नियमानुसार याबाबत वेळाेवेळी माहिती देण्यात येईल. लेखा हिशाेबात झालेल्या गडबडीबाबत करण्यात आलेल्या आराेपानंतर एनएसईने इन्फाेसिसकडून उत्तर मागितले हाेते. इन्फाेसिसच्या उत्तरानंतर कंपनीच्या समभाग किंमती ६ % उसळल्याचे दिसले परंतु बंद हाेताना त्यात ३ % वाढ झाली. इन्फाेसिसने २१ आॅक्टाेबरला सांगितले की सीईआे सलिल पारेख व सीएफआे निलंजन राॅय यांच्यावर अज्ञात कर्मचाऱ्यांनी लेखा हिशाेबात चुकीची पध्दत वापरल्याचा आराेप केला असून त्याचा तपास सुरू आहे. आराेपानुसार अधिकाऱ्यांनी कंपनीचा महसुल व नफा वाढवण्यासाठी चुकीची पध्दत अवलंबली.

शेअर्स भाव गेले ७०० रुपयांच्यावर
व्हिसलब्लोअरच्या आराेपांवर इन्फोसिसने केलेल्या विधानानंतर कंपनीच्या समभाग किंमतीत तेजी आली. सोमवारी इन्फोसिसचे शेअर्स ३.०५ % उसळी घेत ७०९ रुपयांच्या भावावर बंद झाले. १८ आॅक्टाेबरला कंपनीच्या एका समभागाची किंमत ७६७ रुपये हाेती. त्यानंतर पहिल्यांदा शेअर्सचेभाव ७०० रुपयावर गेले आहेत.

सेबीपण करते आहे प्रकरणाचा तपास
इन्फोसिसचे सीईओ आणि सीएफओ यांच्यावर करण्यात आलेल्या आराेपांची अमेरिकेतल्या शेअर बाजाराचे रेग्युलेटर सिक्युरिटीज अंॅड एक्सचेंज कमिशन देखील तपास करत आहे. कंपनी न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंजमध्येही लिस्टेड आहे. भारतीय शेयर बाजार नियंत्रक सेबीने तपास सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...