business / तिमाही आधारावर एप्रिल-जूनमध्ये इन्फोसिसचा नफा ६.८% घटला; कंपनीने चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा अंदाज ८.५-१० टक्के केला

या वर्षी मार्च तिमाहीमध्ये कंपनीला ४,०७८ कोटींचा नफा झाला होता, जून तिमाहीत उत्पन्न १४% वाढून २१,८०३ कोटी रु.

वृत्तसंस्था

Jul 13,2019 09:02:00 AM IST

नवी दिल्ली - देशातील दुसरी सर्वात माेठी अायटी कंपनी इन्फोसिसने एप्रिल ते जून तिमाहीमध्ये ३,८०२ कोटी रुपयांचा नफा मिळवला आहे. वार्षिक आधारावर हा ५.२ टक्के जास्त आहे, तर तिमाहीच्या आधारावर यामध्ये ६.८ टक्क्यांची घट झाली आहे. कंपनीने मागील वर्षी जून तिमाहीमध्ये ३,६१२ कोटी रुपयांचा नफा कमावला होता. या वर्षी मार्च तिमाहीमध्ये नफ्याचा आकडा ४,०७८ कोटी रुपये होता. याचबरोबर इन्फोसिसने चालू आर्थिक वर्षासाठी त्यांच्या उत्पन्नाचा अंदाज (रेव्हेन्यू गाइडन्स) वाढवून ८.५ टक्के ते १० टक्के केला आहे. याआधी एप्रिलमध्ये कंपनीने उत्पन्नाचा ७.५ ते ९.५ टक्के अंदाज व्यक्त केला होता. कंपनीचे सीईओ आणि एमडी सलील पारेख यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.


त्यांनी सांगितले की, चालू आर्थिक वर्षाची सुरुवात मजबुतीसह झाली आहे. जून तिमाहीमध्ये वार्षिक आधारावर कंपनीचा व्यवसाय १२.४ टक्के आणि त्याचा डिजिटल महसूल ४१.९ टक्क्यांच्या गतीने वाढला आहे. ग्राहकांवर लक्ष केंद्रित केल्याने आणि गुंतवणुकीतून कंपनीने हे यश मिळवले आहे. जून तिमाहीत इन्फोसिसचे उत्पन्न १४ टक्क्यांनी वाढवून २१,८०३ कोटी रुपये राहिले.

ऑपरेटिंग प्रॉफिटच्या मार्जिनमध्ये घट, तरी पुढील काळासाठी गाइडन्स कायम
इन्फोसिसचा ऑपरेटिंग प्रॉफिट जून तिमाहीमध्ये २०.५ टक्के राहिला. हा मार्च तिमाहीचा याचा आकडा २३.७ टक्के आणि एका वर्षापूर्वीच्या समान तिमाहीतील आकड्याच्या २१.४ टक्के पेक्षा कमी आहे. मात्र, याच्या पूर्ण वर्षातील उद्दिष्ट २१-२३ साध्य करण्यात कंपनी यशस्वी ठरेल, असा विश्वास आहे.

१० कोटी डॉलरपेक्षा जास्त रकमेचे दोन नवीन ग्राहक

इन्फोसिसने जून तिमाहीदरम्यान १० कोटी डॉलरपेक्षा जास्त रकमेचे दोन नवीन ग्राहक जोडले आहेत. त्यांची एकूण संख्या वाढून २७ झाली आहे. मागील वर्षी जून तिमाहीमध्ये ही संख्या २४ तर याच वर्षी मार्च तिमाहीमध्ये २५ होती.

कर्मचारी नोकरी सोडण्याच्या दरात किरकोळ वाढ

इन्फोसिस कर्मचाऱ्यांचा नोकरी सोडण्याचा दर वाढून २३.४% झाला आहे. हा मागील वर्षी जून तिमाहीमध्ये २३% तर याच वर्षी मार्च तिमाहीमध्ये २०.४ टक्के होता. कंपनी व्यवस्थापनाने ही वाढ हंगामी असल्याचे म्हटले आहे.

अतिरिक्त नगदीचा ८५% वाटा ५ वर्षांत शेअरधारकांना देणार

कंपनीकडे असलेल्या अतिरिक्त नगदीतील ८५ टक्के वाटा पुढील पाच वर्षांत शेअरधारकांना लाभांश किंवा शेअर बायबॅकच्या माध्यमातून परत करणार असल्याचे इन्फोसिसने सांगितले आहे. आतापर्यंत धोरणानुसार कंपनी दरवर्षी शेअरधारकांना ७० टक्के वाटा परत करत होती. सध्याच्या स्थितीत इन्फोसिस आधी घोषित केलेले ८,२६० कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकच्या योजनेला पू्र्ण करण्याचे काम करत आहे. आतापर्यंत कंपनीने ५,९३४ कोटी रुपयांचे शेअर खरेदी केले आहेत.

X
COMMENT