Home | International | China | infosys to open new campus in shanghai

इन्फोसिसची शांघायमध्ये नवीन शाखा चालू करणार

Agency | Update - May 21, 2011, 03:39 PM IST

इन्फोसिस या कंपनीची शाखा आता चीनमधील शांघाय येथे सुरु होणार आहे.

  • infosys to open new campus in shanghai

    infosys_256नवी दिल्ली - भारतात सॉफ्टवेअर निर्यातदारांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या इन्फोसिस या कंपनीची शाखा आता चीनमधील शांघाय येथे सुरु होणार आहे.

    इन्फोसिस कंपनीने एका निवेदनाद्वारे हे स्पष्ट केले आहे. या निवेदनात दिलेल्या माहितीप्रमाणे इन्फोसिस या नविन शाखेसाठी सुमारे सव्वा ते दीड अब्ज अमेरीकन डॉलर्स इतकी गुंतवणूक करणार आहे. शांघायमधील सुमारे 15 एकर जागेवर हि शाखा उभी राहत असून, ती पूर्ण होण्यासाठी तीन वर्षांचा अवधी लागणार आहे. याठिकाणी सुमारे आठ हजार कर्मचाऱ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शांघाय हे शहर सॉफ्टवेअर इंडस्ट्रीसाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे.Trending