आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Infosys's Profit Raise 23% To Rs 4,466 Cents In The December Quarter, Compared To 3,610 Cents In The Same Quarter A Year Ago.

डिसेंबर तिमाहीत इन्फाेसिसचा नफा 23% वाढून 4,466 काेटी रुपये, एक वर्ष आधी याच तिमाहीत इन्फाेसिसला 3,610 काेटींचा नफा

3 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
प्रवीण राव, सीओओ, इन्फोसिस आणि नीलंजन रॉय, सीएफओ, इन्फोसिस - Divya Marathi
प्रवीण राव, सीओओ, इन्फोसिस आणि नीलंजन रॉय, सीएफओ, इन्फोसिस

बंगळुरू : देशातील दुसरी सर्वात माेठी आयटी कंपनी असलेल्या इन्फाेसिसच्या नफ्यात डिसेंबर तिमाहीमध्ये २३.७ % वाढ हाेऊन ४,४६६ काेटी रुपयांवर गेला. या अगाेदरच्या वर्षात याच तिमाहीत ३,६१० काेटी रुपये झाला हाेता. त्याचबराेबर कंपनीने चालू आर्थिक वर्ष २०१९-२० साठी आपला महसुलाचा अंदाज वाढवून १०-१०.५ % केला आहे. आधी कंपनीने अाॅक्टाेबरमध्ये ९ ते १० टक्के वाढ हाेण्याचा अंदाज व्यक्त केला हाेता.

कंपनीने शुक्रवारी २०१९-२० या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीतील निकाल जाहीर केले. डिसेंबर तिमाहीत कंपनीचा महसूल ७.९ % वाढून २३,०९२ काेटी रुपये झाला. या अगाेदरच्या वर्षात याच तिमाहीमध्ये २१,४०० काेटी रुपये झाला हाेता. अमेरिकी डाॅलरचा विचार करता इन्फाेसिसच्या डिसेंबर तिमाहीतील निव्वळ नफ्यात २४.८ % वाढ हाेऊन ६२.७ काेटी डॉलरवर गेला. महसूल ८.६ % वाढून ३२४ काेटी डाॅलरवर गेला. तिमाहीत कंपनीचे अाॅपरेटिंग मार्जिन ०.६० टक्के कमी हाेऊन २१.९ टक्के झाले. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत २२.६ % हाेते. इन्फाेसिसचे सीईअाेव एमडी सलिल पारेख म्हणाले, तिमाही निकाल अामचा प्रवास वेगाने व भक्कमरित्या वाटचाल करीत असल्याचे दाखवताे.

इन्फोसिसला ३,६१० काेटी रुपयांचा नफा झाला हाेता

डिसेंबर तिमाहीत माेठे २८ नवीन ग्राहक जाेडले

 • रक्कम - ग्राहक संख्या
 • १०लाख डॉलरचे - ७०५
 • एक काेटी डॉलरचे - २३२
 • पाच काेटी डाॅलरचे - ६१
 • १० काेटी डाॅलरचे - २८

माेठ्या साैद्यांच्या संख्येत ५६ % वाढ

माेठे साैदे हाेण्यासाठी अाम्हाला सातत्याने मजबुती मिळत अाहे. त्यामध्ये ५६ % वाढ बघायला मिळली अाहे. कर्मचाऱ्यांनी कंपनी साेडण्याचे प्रमाणही कमी केले अाहे. -प्रवीण राव, सीओओ, इन्फोसिस

गुंतवणूक परतावा वाढून २५.९ %वर

डिसेंबर तिमाहीत कंपनीचा फ्री कॅश फ्लाे १५० काेटी डाॅलरपर्यंत गेला. मार्जिन अाणि भागधारकांच्या देयामध्ये वाढ झाल्याने गुंतवणूक परतावा वाढून २५.९ % झाला. -नीलंजन रॉय, सीएफओ, इन्फोसिस

तिमाही काळात ७,०० नवीन कर्मचाऱ्यांची भरती

 • इन्फोसिसने एकूण ६,९६८ नव्या कर्मचाऱ्यांची भरती केली
 • एकूण कर्मचाऱ्यांची संख्या वाढून २,४३,४५४ वर गेली
 • कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी नाेकरी साेडण्याचे प्रमाण १९.६ %

पारेख- राॅय यांच्या विराेधातील अाराेपांचे पुरावे मिळाले नाहीत.

इन्फाेसिसने सांगितले की सीईअाे सलील पारेख अाणि सीएफअाे निलंजन राॅय यांच्याविराेधातील अाराेपांचे काेणतेही पुरावे मिळाले नाही. संचालक मंडळच्या लेखा समितीला व्हिसलब्लाेअरच्या अाराेपांसाठी काेणताही अाधार मिळाला नाही. तक्रारीमध्ये पारेख अाणि राॅय यांनी कंपनीचा नफा जास्त दाखवण्यासाठी लेखा पध्दतीत फेरफार केल्याचा अाराेप हाेता. इन्फाेसिसने व्हिसलब्लाेअरच्या तक्रारींचा २२ अाॅक्टाेबरला खुलासा केला हाेेता.

 

बातम्या आणखी आहेत...