आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलस्त्रोत रक्षणासाठी पोलिस उपमहानिरीक्षकांचा पुढाकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- अमरावती विभागात यंदा पावसाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे नैसर्गीक जलस्त्रोतांमध्ये पाणी नाही किंवा ज्या स्त्रोतांमध्ये आहे त्याठिकाणी अत्यल्प आहे. यातही सार्वजनिक मंडळांच्या दुर्गामुर्ती विसर्जनानंतर या जलस्त्रोतातील पाणी वापरायोग्य राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाने दुर्गा मुर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करण्याचे आवाहन अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी केले आहे. यासोबतच प्रत्येक शहरात किंवा गावात स्थानिक स्वराज्य संस्था किंवा ग्रामपंचायतने कृत्रिम तलाव तयार करून द्यावेत, यासाठी विभागीय आयुक्तांसोबत चर्चा करणार असल्याचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी 'दै. दिव्य मराठी'सोबत बोलताना गुरूवारी (दि. २७) सांगितले. 


नुकताच गणेशोत्सव पार पडला. गणेशोत्सवादरम्यान सार्वजनिक मंडळांसोबत घरगुती गणेश मुर्तींची स्थापणासुध्दा मोठ्या संख्येत राहते. काही दिवसांपुर्वीच गणेश मुर्तींचे विसर्जन झाले आहे. क्वचित सार्वजनिक मंडळांच्या श्री मुर्तींचे विसर्जन अजूनही बाकी आहे. यंदा पावसाळा अत्यल्प झाल्यामुळे अनेक ठिकाणच्या नद्या - नाले कोरड्या आहेत, तलावांमध्ये पुरेसे पाणी नाही. दरम्यान गणेश मुर्तींचे विसर्जन तर पार पाडले आहे मात्र ज्या ठिकाणी विसर्जन करण्यात आले, त्या ठिकाणांची परिस्थिती आम्ही स्वत: जावून पाहली असता पाणी कमी असल्यामुळे विसर्जीत झालेल्या मुर्त्या जागच्या जागीच आहे. त्यामुळे तेथील पाणीसुध्दा आता संपले आहे. अशीच परिस्थिती अनेक ठिकाणांची आहे. ती परिस्थिती दुर्गा मुर्तींच्या विसर्जनानंतर निर्माण होवू नये म्हणून कृत्रिम तलावात मुर्तींचे विसर्जन करण्यात यावे, असा आमचा प्रयत्न आहे. कारण पाण्याची कमतरता, यातच आहे ते पाणीसुध्दा विसर्जनानंतर शेतकऱ्यांच्या किंवा गुरांच्या पिण्यासाठीही उपयोगात येणार नसल्याचे अनेक ठिकाणची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रत्येक मंडळाने कृत्रिम तलावात मुर्तींचे विसर्जन करावे. असे आवाहन करण्यात येणार आहे. 


दुसरीकडे विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची व्यवस्था संबधित ग्रामपंचयात किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांनी करावी, त्यासाठी विभागीय आयुक्तांसोबत तसेच पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यात येणार आहे. कृत्रिम तलावात मुर्तींच्या विसर्जनासाठी नागरीकांना आवाहन करावे, अशा सूचना पाचही जिल्हा पोलिस अधीक्षकांना देण्यात येणार असल्याचे अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे यांनी सांगितले आहे. 

बातम्या आणखी आहेत...