आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन्यप्राण्यांच्या धडकेमुळे दोन अपघातात चौघे जखमी: दोघांची प्रकृती गंभीर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगाव रेल्वे- तालुक्यात वन्य प्राण्यांच्या धडकेमुळे दोन अपघातात चौघांवर जखमी होण्याच्या घटना बुधवारी (दि. २८) घडल्या. जखमी झालेल्या चौघांपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. दोन्ही अपघात सकाळच्या सुमारास जळगाव फाटा व कावली येथे झाले. माधव काळे व रेणुका भागवत दाघेही रा. मंगरूळ दस्तगीर, तर अविनाश चाफले व ओंकार उंदरे, रा. कावली अशी जखमींची नावे आहे. चौघांनाही उपचारासाठी सावंगी मेघे येथे पाठविण्यात आले. यापैकी माधव काळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


घटनेच्या वेळी काळे हे भाची रेणुकाला महाविद्यालयात सोडण्यासाठी मंगरुळ दस्तगीर येथून धामणगाव येथे जात होते. दरम्यान जळगाव फाट्याजवळ रानडुक्कर आडवे आल्याने त्यांच्या दुचाकीला अपघात झाला. दोघांनाही प्रारंभी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु काळे हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ सावंगी मेघे येथे पाठवण्यात आले. दुसरा अपघात गुंजी फाट्यालगत सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. कावली येथील लाभचंद मूलचंद राठी विद्या मंदिरात शिक्षक असलेले अविनाश चाफले व ओंकार उंदरे हे एकाच दुचाकीने धामणगाववरून कावली येथे जात होते. दरम्यान, गुंजी फाट्याजवळ दुचाकीला रोही आडवा आल्यामुळे दुचाकीचा अपघात झाला. दोन्ही शिक्षक जखमी झाले. प्रथम त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले, परंतु अविनाश चाफले यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे सावंगी मेघे येथील रुग्णालयात भरती करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर आहे. 

बातम्या आणखी आहेत...