आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Innocent Child Dies In Car Accident Car Crushed The While In Sleeping

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आईने एका वर्षाच्या मुलाला दुध पाजून रस्त्यावर झोपवले, ऊन लागू नये म्हणून त्यावर टाकली ओढणी; पण नंतर तो उठलाच नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


सूरत : येथील हेल्थ क्लबसमोर सर्व्हिस रोडवर एका कारने झोपलेल्या निष्पाप जीवाला चिरडण्याची घटना घडली. वेसूत व्हीआयपी रोडवर सुशोभिकरणाचे काम सूरू आहे. याठिकाणी 12 लोकांसोबत मुलाचे आई-वडील रस्त्यावर ब्लॉक लावण्याचे काम करत होते. बुधवारी सकाळी 11 वाजेच्यासुमारास सर्व्हिस रोडवरील सीवेज लाइनच्या झाकणावर मुलाच्या आईने त्याला झोपवले होते. दरम्यान अचानक एक कार आली आणि मुलाला चिरडून निघून गेली. यामुळे मुलाला गंभीर दुखापत झाली होती. त्याला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. 

 

आरोपीला केली अटक

मागील एका महिन्यापासून मनु पारगी आणि त्याची पत्नी येथे काम करत आहेत. बुधवारी सकाळी 10.30 वाजता त्याची पत्नी काम करत असताना मुलगा रडत होता. मुलाला रडणे ऐकून आईने त्याला दूध पाजले. यादरम्यान मुलाला झोप लागली. त्यामुळे तिने सर्व्हिस रोडवरील सीवेज झाकणावर मुलाला झोपवून त्याच्यावर ओढणी टाकली. तेवढ्यात अंदाजे 11 वाजता एका कार मुलाच्या अंगावरून गेली. 


अपघातानंतर ड्रायव्हर घटनास्थळावरून काढला पळ

अपघात झाल्यानंतर 10 मीटर लांब गेल्यानंतर चालकाने कार थांबविली होती. पण लोकांची वाढती गर्दी पाहून त्याने तेथून पळ काढला. घटनास्थळी काम करणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, कार एकदम हळू येत होती. असे वाटले की, चालकाचे लक्ष दिले नाही आणि आरामात मुलाच्या अंगावरून गाडी घातली. कारचे दोन्ही चाक मुलाच्या अंगावरून गेले होते. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. आम्हाला काही समजण्याअगोदर चालक फरार झालात. एका खासगी रूग्णालयात उपचार सुरु असताना मुलाचा मृत्यू झाला.

 

मला वाटले की, ओढणी पडलेली आहे. त्यामुळे काहीच समजले नाही. 

 

पोलिसांनी कार चालक संदीप गुप्ती अटक केली आहे. त्याने सांगितले की, कार चालवत असताना रस्त्यावर एखादी ओढणी पडलेली असल्याचे त्याला वाटले. त्यामुळे त्याला काही समजले नाही. खटोदरा पोलिसांनी सांगितले की, आरोपीला त्याच्या गाडीतूनच पोलिस ठाण्यात आणले आहे. तसेच त्याची कार देखील ताब्यात घेण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.