आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचऱ्याप्रमाणे 25 फुटांवरून नदीत फेकली नवजात चिमुरडी, हात-पाय तुटले अनेक जखमा झाल्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

डेहराडून - आई वडील आपल्या मुलांप्रती एवढी निर्दयी कसे असू शकतात? कोणी चिमुरड्या मुलीला कचरा समजून 25 फूट उंच पुलावरून कसे फेकू शकते? डेहराडूनमध्ये सध्या हे दोन प्रश्न लोकांना हादरवून सोडत आहेत. रविवारी सकाळी येथे बिंदाल नदी मध्ये एक नवजात चिमुरडी अत्यंत गंभीर जखमी अवस्थेत आढळली होती. उंचावरून फेकल्यामुळे तिचे हात पाय तुटले होते. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी जखमा आणि व्रण होते. लोकांनी तिला रुग्णालयात नेऊन वाचवण्याचा प्रयत्न केला. पण तिला या असह्य वेदना सहन झाल्या नाही, आणि तिने जगाचा निरोप घेतला. 


रविवारी पहाटे साडेसहा वाजता डेहराडूनच्या शिवाजी मार्गावरील बिंदाल नदीमधून एका नवजात चिमुरडीच्या रडण्याचा आवाज येत होता. नगर पालिकेचे कर्मचारी कुलदीप यांनी सर्वात आधी तो आवाज ऐकला होता. ते पहाटे 5 वाजता प्राण्यांना चारा देण्यासाठी बाहेर पडले होते. त्यांनी नगरसेवक पार्षद विशालला याबाबत सूचना केली होती. त्यांनी तत्काळ मुलीला हॉस्पिटलमध्ये पोहोटवले. डून हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. के के टम्टा यांनी सांगितले की, अथक प्रयत्नानंतरही चिमुरडीला वाचवण्यात यश आले नाही. सोमवारी पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास केला.  

बातम्या आणखी आहेत...