Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Innovative use of Computer and internet in teaching

शिक्षक दिन विशेष : संगणक व इंटरनेटचा अध्ययन, अध्यापनात कल्पक वापर

श्रीनिवास दासरी | Update - Sep 05, 2018, 11:17 AM IST

तांड्यावरच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसतात. परंतु तिथे जाणीवपूर्वक काम करून इतक्या सुविधा निर्माण केल्या, की शहरातील प

 • Innovative use of Computer and internet in teaching

  सोलापूर- तांड्यावरच्या शाळांमध्ये मूलभूत सुविधा नसतात. परंतु तिथे जाणीवपूर्वक काम करून इतक्या सुविधा निर्माण केल्या, की शहरातील प्रगत खासगी शाळांमध्येदेखील नसतील. अध्ययन आणि अध्यापनात संगणक आणि इंटरनेटचा कल्पक वापर सुरू केला. तांड्यावरची मुले संगणक सहजरीत्या हाताळू शकतात. त्यामुळेच शाळा सिद्धी गुणांकनात 'अ' प्रगतश्रेणी मिळाली.


  गावपातळीवर प्रामुख्याने तांड्यावरील शाळा कशा असाव्यात, याची पाहणी करण्यासाठी अहमदाबादच्या एका अभ्यास गटाने या शाळेस भेट दिली. शाळेचे उपक्रम पाहून त्यातील अधिकारी अवाक् झाले. केवळ शिक्षकांच्या पुढाकारातूनच असे उपक्रम राबवता येतात, हे त्यांचे गौरवोद््गार. त्यानंतर राज्याच्या प्राथमिक शिक्षण परिषदेच्या एका शिष्टमंडळाने भेट दिली. त्यांच्याकडूनही कौतुक झाले. ज्ञानरचनावादी वर्ग आणि डिजिटल शाळा, त्याही तांड्यावरच्या शाळेत याचेच आश्चर्य वाटते. परंतु हे आम्ही केले, असे आत्मविश्वासपूर्ण उद््गार या शाळेतील शिक्षकांनी काढले.


  शाळेतील साहित्य स्वनिर्मित आहे. एकूणच शिक्षण आनंददायी असल्याने २०१२-१३ पासून पटाचा आलेख हा चढताच राहिला आहे. शाळेचा स्मार्ट बोर्ड मुलांच्या आवडीचा. त्यांचे लक्षच विचलित होत नाही. ग्रामीण भागात विजेचे भारनियमन असते म्हणून सोलार पॅनल बसवले. त्यासाठी लोकसहभागातून ३ लाख रुपये जमा केले. मुलांनी श्रमदान केले. त्यातूनच या सर्व गोष्टी आल्या.


  तळे हिप्परग्याच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षक म्हणून सुरू झालेला प्रवास खूपच अानंददायी आणि प्रेरणादायी आहे. शाळेतल्या ज्येष्ठांचे पाठबळ आणि अधिकाऱ्यांची शाबासकी त्यानेच खऱ्या अर्थाने उपक्रमशील शिक्षक बनता आले. कोणतेही काम मनापासून करण्याची सवयच लागली. 'विद्यार्थी हेच दैवत'हाच भाव जोपासत अनेकविध उपक्रम राबवता अाले.


  दर शनिवारी इंग्रजी संभाषण
  अध्यापनाबरोबरच गायन, नाट्यलेखन, सादरीकरण आदी उपक्रमही राबवतो. मुलांच्या सहभागातून वैविध्यपूर्ण शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली. अक्षरस्पर्श उपक्रम नित्यच आहे. विशेष म्हणजे दर शनिवारी इंग्रजीतून भाषण आणि संभाषण घेतो. तांड्यावरील इंग्रजी उच्चार सहजगत्या करतात. त्याचा सर्वंकष परिणाम म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी पोषक वातावरण तयार झाले.

  - राहुल सुरवसे, उपशिक्षक, जिल्हा परिषद शाळा, लोकुतांडा, ता. उत्तर सोलापूर

Trending