आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाटणा - भाजप व जदयू आघाडीच्या नितीशकुमार सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघासह १९ संघटनांच्या चाैकशीचे आदेश दिल्याचा गाैप्यस्फाेट झाल्याने बिहारच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
बिहारच्या विशेष शाखेचे पाेलिस अधीक्षकांनी सर्व जिल्ह्यांच्या पाेलिस उपअधीक्षकांना २८ मे राेजी पत्र पाठवून संघ, विहिंप, बजरंग दल, हिंदू जागरण समिती, धर्म जागरण समन्वय समिती, मुस्लिम राष्ट्रीय मंच, हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रीय सेविका समिती, शिक्षा भारती, दुर्गावाहिनी, स्वदेशी जागरण मंच, भारतीय किसान संघ, भारतीय मजदूर संघ, भारतीय रेल्वे संघ, अखिल भारतीय विद्यार्थी संघ इत्यादी संघटनांच्या चाैकशीचे आदेश देण्यात आले आहेत. आघाडीत असूनही संघाची गाेपनीय चाैकशी केली जात असल्याने सरकारवर टीका केली जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारच्या व नेत्यांच्या बचावात्मक स्पष्टीकरण देताना नाकीनऊ आले आहेत. दुसरीकडे महाआघाडीचे काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलाने नितीश सरकारच्या या कारवाईचे स्वागत केले आहे. त्यावर भाजपचे खासदार राकेश सिन्हा म्हणाले, संघ तसेच त्यासंबंधीमाहिती संकलित करण्याचे आदेश नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे. संघ ही राष्ट्रभक्त संघटना आहे. सरकार असे का करत आहे? आता तर सरकारचीच चाैकशी करावी, असे भाजपचे आमदार संजय सरावगी यांनी म्हटले आहे.
संघ काय हे प्रत्येकाने सखाेल जाणून घ्यावे : इंद्रेशकुमार
प्रत्येकाने संघाबद्दलची माहिती संकलित केली पाहिजे. त्यात काही गैर नाही. माहिती गाेळा करून प्रत्येकाने संघाला जाणून घेतले पाहिजे. त्यामुळेच पाेलिस किंवा बिहार सरकार चाैकशी करत असेल तर त्याला आमची काही हरकत नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते इंद्रेशकुमार यांनी दिली. खरे तर काँग्रेसने गेल्या दहा वर्षांत तपास संस्थांचा गैरवापर केला. हिंदू संघटनांना बदनाम करण्याचे काम केले. त्यानंतरही काँग्रेसला संघाच्या विराेधातील माेहीम यशस्वी करता आली नव्हती, असे इंद्रेशकुमार यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.