आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सड़क 2' वर होणार नाही 'इंशाअल्लाह'चा परिणाम, आलियाने केली तारखांची जुळवाजुळव 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

70 टक्के शूटिंग झाले पूर्ण  12 तास काम करत आहेत महेश  03 भाग झाले पूर्ण      

एंटरटेन्मेंट डेस्क : चित्रपटाचा निर्माते मुकेश भट्ट म्हणतात..., आमचे कुटुंब आधी एकमेकांच्या कामाला प्राधान्य देते. तारखांची जुळवाजुळव करणे आलियाला अवघड नव्हते. या चित्रपटाचे 70 टक्के शूटिंग पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत शूटिंग पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि ते होईलही. माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत उभे आहे. महेशदेखील यात पूर्ण लक्ष देत आहेत. सेटवर ते 12-12 तास काम करत आहेत. 
 
 

म्हणून संजयने दिल्या होत्या 'शमशेरा'ला तारखा...  
आलियाने आपल्या तारखा 'इशांअल्लाह'ला दिल्यामुळे संजयने आपल्या तारखा 'शमशेरा'ला दिल्या हाेत्या. त्यानंतर 'सडक 2'चे शूटिंग पुढे ढकलू शकते, असा अंदाज लावला जात होता, मात्र आता आलियाच्या 'इशांअल्लाह'चे शूटिंग रद्द झाले त्यामुळे ती 'सड़क 2'मध्ये काम करेल 
 
 

शूटिंग शेड्यूल सेट...  
'इंशाअल्लाह'मुळे वडील महेश भट्टच्या 'सड़क 2' चित्रपटावर काही परिणाम होऊ नये याची आलिया भट्टने पुरेपूर काळजी घेतली आहे. ती 15 सप्टेंबरपासून याच्या चौथ्या शेड्यूलचे शूटिंग सुरू करणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या तीन भागाचे शूटिंग उटी, म्हैसूर आणि राेमानियामध्ये झाले आहे. आता चौथा भाग उत्तराखंडच्या डोगर-दऱ्यात चित्रित केला जाईल. आलियाने या चित्रपटासाठी आपल्या तारखांची जुळवाजुळव केली आहे. या चित्रपटाच्या तारखा तिने 'इंशाअल्लाह'ला दिल्याची चर्चा होती. 
 
 

महेश भट्ट यांच्या निधनाची अफवा, पूजाने दिला पुरावा...  
महेश भट्ट यांची मोठी मुलगी पूजाने सोशल मीडियावर पसरलेल्या वडिलांच्या मृत्यूच्या बातमीचे खंडन केले आहे. पुरावा म्हणून तिने वडिलांचे दोन फोटो शेअर केले आहेत. यात ती घरात आराम करताना दिसत आहेत. यावर पूजाने लिहिले..., 'अफवा पसरवणारे लोक आणि महेश भट्टच्या निधनाची बातमी ऐकून दु:ख होणाऱ्या लोकांसाठी हा पुरावा. ते ठणठणीत असून नेहमीप्रमाणे मस्त जीवन जगत आहेत. 
 
 

जुने गाणे वापरणार नाही...  
सिनेमॅटोग्राफी 'राजी' फेम जेआई पटेल सांभाळत आहेत. त्यांचे नाव आलियाने सुचवले होते. असो. भट्ट कॅम्पच्या चित्रपटाचे वैशिष्ट्य त्यांचे गीत-संगीत राहिलेले आहे. मुकेशने ठामपणे सांगितले की, आम्ही जुन्या गाण्यांचा वापर यात करणार नाही. अशा प्रकारचे गाणे लोकांना बळजबरी ऐकायला आम्ही भाग पाडणार नाही. आम्ही जित गांगुली आणि अंकित तिवारीसोबत काम करतोय. 
 
 

टाेरंटो सिने महोत्सवात दाखवला जाईल 'द स्काय इज पिंक'...  
प्रियंका चोप्रा आणि फरहान अख्तरचा चित्रपट 'द स्काय इज पिंक' टोरंटो आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाची स्क्रिनिंग तेथे 13 सप्टेंबर रोजी होणार आहे. ही माहिती देत प्रियंकाने लिहिले, 13 सप्टेंबर रोजी टीमसोबत या प्रीमियरवर जाण्याची वाट पाहू शकत नाही.यासाठी मी खूपच उत्साहित आहे. शोनाली दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंका आणि फरहानच्या व्यतिरिक्त जायरा वसीमदेखील मुख्य भूमिकेत दिसेल. भारतात हा 11 ऑक्टोबर रोजी रिलीज होईल.

बातम्या आणखी आहेत...