आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीप-वीर वेडिंग / पाहुण्यांनाही सांगण्यात आले नव्हते वेडिंग लोकेशन, कोकणी लग्नानंतर पुरण पोळी होता खास मेन्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण कोकणी आणि सिंधी पद्धतीने विवाहबद्ध झाले आहेत. 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी इटलीतील लेक कोमो येथे थाटात दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर दोघे लगेच कामावर परतणार असल्याचे म्हटले गेले होते. पण आता वृत्त आहे की, हे दोघे हनीमूनवर जाणार आहेत.


पाहुण्यांनाही ठाऊक नव्हते वेडिंग लोकेशन...

प्रायव्हसीसाठी पाहुण्यांनाही लेक कोमो येथे नेमक्या कुठल्या व्हिलात लग्न होणार आहे, याची माहिती देण्यात आली नव्हती. त्यांना सकाळी 7 वाजता तयार  होण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर बोटीतून पाहुण्यांना वेडिंग लोकेशनवर नेण्यात आले.


रेड आणि गोल्डन साडीत होती दीपिका...

दीपिकाने कोकणी पद्धतीने झालेल्या लग्नात व्हिलाच्या टेरेसवरुन लग्नमंडपापर्यंत गेली. यावेळी गायिका शुभा मुदगल यांनी लाइव्ह परफॉर्मन्स दिला. दीपिकाने या लग्नात रेड आणि गोल्डन कलरची साडी परिधान केली होती, तर रणवीर व्हाइट कुर्ता आणि धोतीमध्ये होता. दीपिकाला रणवीरच्या गळ्यात वरमाला  घालताना बघून तिचे कुटुंबीय अतिशय भावूक झाले होते.

 

पाहुण्यांसाठी होता पुरण पोळीचा खास मेन्यू... 
कोकणी पद्धतीने झालेल्या लग्नात पाहुण्यांसाठी खास मेन्यू होता. यामध्ये पुरण पोळी आणि रस्सम या दोन खास डिश होत्या. यासाठी कर्नाटकहून खास शेफ बोलावण्यात आले होते. पाहुण्यांना फिल्टर कॉफीही सर्व्ह करण्यात आली, ती खास बंगळुरुहून मागवण्यात आली होती.

 

हनीमूनचे प्लानिंग...
दीपिका-रणवीरच्या हनीमूनसंदर्भातही अनेक बातम्या आल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, लग्नापूर्वीच रणवीर आणि दीपिका यांना वेगवेगळ्या टुरिज्म बोर्ड्सकडून महागड्या हनीमून ट्रिपचे इन्व्हिटेशन आले आहेत. यामध्ये स्वित्झर्लंड पर्यंटन बोर्ड सगळ्यात पुढे आहे. रणवीर स्वित्झर्लंड टुरिज्मचा भारतीय ब्रॅण्ड अॅम्बेसेडर आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, स्वित्झर्लंड पर्यंटन बोर्डाने या कपलला निसर्गरम्य ठिकाणी हनीमून साजरा करण्याचे इन्व्हिटेशन पाठवले आहे.

 

हनीमूननंतर परतणार कामावर...
बातम्यांनुासर, हनीमूनहून परतल्यानंतर दोघे आपापल्या कामात बिझी होतील. रणवीर झोया अख्तरच्या गली बॉइज आणि रोहित शेट्टीच्या सिंबा या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त होईल. तर दीपिका मेघना गुलजारच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करणार आहे. हा चित्रपट अॅसिड सरव्हाइव्हर लक्ष्मी अग्रवाल हिच्या आयुष्यावर बेतला आहे.  
 

बातम्या आणखी आहेत...