आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 कोटींच्या फ्लॅटनंतर आता आलिया भटने खरेदी केली लग्जीरियस वॅनिटी व्हॅन, शाहरुखच्या पत्नीने केली आहे डिझाइन, 3 आपार्टमेंटची मालकिन आहे आलिया 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. आलिया भटने काही दिवसांपुर्वी मुंबईमध्ये नवा फ्लॅट खरेदी केला होता. आता तिने एक लग्जीरियस वॅनिटी व्हॅन खरेदी केल्याचे वृत्त आहे. याचा फोटो स्वतः आलियाने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये आलिया भट आपल्या न्यू वॅनिटी व्हॅनमध्ये वेळ घालवताना दिसतेय. आलियाची ही वॅनिटी व्हॅन शाहरुखची खानची पत्नी गौरीने डिझाइन केली आहे. यामध्ये मूड लाइट्स, विक्टोरियन काळातील लँप डिफरेंट पेंटिग्स लावलेल्या आहेत. तर फ्लोरला वुडन टच दिला आहे. पण आलियाच्या या लग्जीरियस वॅनिटी व्हॅनसाठी किती कोटी खर्च आला याची काही माहिती समोर आलेली नाही. काही काळापुर्वीच आलियाने युहूमध्ये 2300 स्क्वेअर फूटचे अपार्टमेंट खरेदी केले आहे. त्याची किंमत 13.11 कोटी रुपये आहे. या फ्लॅटचे रेडी रेकोनर रेट 7.86 कोटी आहे. पण यासाठी आलियाने जवळपास दुप्पट किंमत दिली आहे. तर आलियाचे दोन जुने फ्लॅट्स मुंबईतच आहेत. यामधील एकाची किंमत 5.16 कोटी आहे. तर दूस-याची किंमत 3.83 कोटी रुपये आहे. 

 

Ex-बॉयफ्रेंडला पाहण्याचीही आलियाची इच्छा नाही 
- आलिया भट्ने एक्स-बॉयफ्रेंडला सिध्दार्थ मल्होत्रासोबतचे सर्वच कनेक्शन तोडले आहेत. खरंतर सिध्दार्थ मल्होत्राने आपल्या घरी एक पार्टी दिली होती. यामध्ये त्याने आलियालाही आमंत्रित केले होते. पण आलिया या पार्टीमध्ये पोहोचली नाही. आलिया भटने सिध्दार्थ मल्होत्रासोबतचे सर्व संबंध मोडले आहेत. तिला आता त्याचासोबत कोणताही संबंध ठेवण्याची इच्छा नाही. यामुळेच ती सिध्दार्थच्या पार्टीमध्येही पोहोचली नाही. 
- रिपोर्ट्सनुसार दोघांना एकत्र यावेच लागणार आहे. कारण करण जोहर लवकरच आलिया भट, वरुण धवन आणि सिध्दार्थ मल्होत्रासोबत 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2'चे काही सीन शूट करणार आहे. करणने खुप समजावल्यानंतर आलिया या शूटसाठी तयार झाली आहे. 
- एन्टटेन्मेंट साइड स्पॉटबॉयनुसार, सिध्दार्थ आणि वरुण यांच्या नात्यातही आलबेल आहे. वरुणलाही सिध्दार्थसोबत शूट करण्यात अडचण आहे. वरुणने शूटिंगसाठी होकार दिला आहे पण आलिया सुध्दार्थसोबत कंफर्ट फील करत नाही. आलिया सध्या रणबीर कपूरला डेट करतेय. 
- आलिया लवकरच रणवीर सिंहसोबत 'गली बॉय'मध्ये दिसणार आहे. 'ब्रम्हास्त्र', 'गली बॉय' आणि 'कलंक' हे तिचे आगामी चित्रपट आहेत.

बातम्या आणखी आहेत...