आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' उद्या होणार रिलीज, या लॅव्हिश डुप्लेक्सचा आहे मालक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जॉन अब्राहमचा 'सत्यमेव जयते' चित्रपट 15 ऑगस्टला रिलीझ होत आहे. जॉन अब्राहम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तो चित्रपटाच्या स्क्रीनिंगसाठी ऑटो रिक्शाने पोहोचला होता. मिलाप झवेरीने 'सत्यमेव जयते' दिग्दर्शित केला आहे. जॉनने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेलिंग क्षेत्रातून केली होती. मॉडेलिंगमध्ये नशीब आजमावल्यानंतर 2003 मध्ये 'जिस्म' या सिनेमाद्वारे त्याने फिल्म इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. 

 

अशी असणार जॉनची भूमिका 
- या चित्रपटात जॉन अब्राहम एका पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. मनोजनेही पोलिस अधिका-याचीच भूमिका साकारली आहे. मात्र जॉन भ्रष्टाचाराविरोधात आपल्या पद्धतीने लढा देतो. अभिनेत्री नेहा शर्माची बहीण आयशा शर्मा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करतेय.
- इंडस्ट्रीत गेल्या 15 वर्षांपासून अॅक्टिव असलेला जॉन आपल्या 5000 Sq.ft च्या लॅव्हिश डुप्लेक्समुळेसुद्धा चर्चेत असतो.

 

सुंदर घराचा मालक आहे जॉन... 
जॉन एका सुंदर आशियानाचा मालक आहे. मुंबईतील वांद्रा बँडस्टँड या परिसरात असलेल्या त्याचे घराचे इंटेरियर कुणाच्याही नजरेत भरणारे आहे. या घराचे इंटेरियर जॉनचे वडील अब्राहम जॉन आणि भाऊ एलनने केले आहे. जॉनचे हे घर पाच हजार चौ. फुटात असून दोन मजली आहे. घरातील बेडरुम, किचन, ड्रॉईंग रुम, डायनिंग रुम आणि हॉलची छायाचित्रे बघून त्याच्या सुंदर इंटेरियरचा अंदाज लावला जाऊ शकतो. त्याच्या घरातून समुद्र दिसतो. या घराच्या डिझाइनसाठी 14 महिन्यांचा काळ लागला होता.


जॉन अब्राहमच्या घराचे Inside Photos बघण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाईड्सवर...

 

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...