Home | National | Delhi | Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

Inside Life of Red light area : दिल्लीत GB रोडवर जन्मलेल्या मुलांनी दाखवले सेक्स वर्कर्सच्या घरातील Inside Photos

दिव्यमराठी वेब टीम | Update - Sep 07, 2018, 06:25 PM IST

'स्कूप्व्हूप'च्या फोटोग्राफर्सनी दिल्लीतील सेक्स वर्कर्सच्या मुलांशी संवाद साधला. त्यांचे दु:ख जाणून घेतले.

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers
  नवी दिल्ली। भारतात सेक्स वर्कर्सला हीन वागणूक मिळते, हे सगळ्यांनाच माहीत आहे. सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या वाट्यालाही असेच खाचखडग्याचे जीवन येते. समाजव्यवस्थेने त्यांना आपल्यात कधीसामावून घेतले नाही. परंतु, 'स्कूप्व्हूप'च्या फोटोग्राफर्सनी दिल्लीतील सेक्स वर्कर्सच्या मुलांशी संवाद साधला. त्यांचे दु:ख जाणून घेतले.

  शाळेत चूक करतं कोणी, छडी मिळते कोणाला...
  जीबी रोडवर राहाणार्‍या 21 वर्षीय अर्जुनची आई सेक्स वर्कर आहे. अर्जुनने सांगितले की, शाळेत इतर मुले त्याची खिल्ली उडवायते. त्यामुळे त्याने शाळा सोडली. चूक इतर मुले करायचे, शिक्षा मात्र अर्जुनलाच व्हायची. अर्जुनने दरियागंजमध्ये एका गॅरेजवर काम सुरु केले. तो सेक्स वर्करचा मुलगा आहे, हे त्याने मालकापासून लपवले. परंतु, जे व्हायचे ते झालेच. अर्जुन कोण आहे, हे एके दिवशी गॅरेज मालकाला समजले. वैफल्यगस्त अर्जुनला अशातच चुकीच्या मुलांची संगत लागली. काम चुकीचे होते पण, तो त्यात समाधानी होता. कारण तो समाजापासून अलिप्त होता. परंतु तो एके दिवशी धाकट्या बहिणीला घेण्यासाठी 'कत-कथा' क्लासेसमध्ये गेला. तेथील वातावरण पाहून अर्जुन भारावला. नंतर तो सातत्याने तिथे जाऊ लागला. हळूहळू तो भूतकाळ विसरु लागला. अर्जुनने नवी सुरुवात करण्‍याचा निर्णय घेतला. आता अर्जुन स्वाभिमानाचे आयुष्य जगतोय. त्याने दिल्लीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  17 वर्षीय निमिषचे दु:ख फारच वेगळे...
  निमिषची आईही सेक्स वर्कर आहे. त्यामुळे तो फॅमिलीविषयी कुठे काही जास्त बोलत नाही. कॅमेरापर्सन्ससोबतही तो तसा कमीच बोलला. पण, त्याच्या डोळ्यात मोठे स्वप्न आहे.

  अर्जुन आणि निमिषला घ्यायची आहे उंच भरारी...
  जीबी रोडवर राहाणारा निमिष आणि अर्जुनला उंच भरारी घ्यायची आहे. दोघांना फोटोग्राफर व्हायचे आहे. 'कत-कथा'चे को-फाऊंडर हार्दिक गौरव यांच्याकडून दोघे फोटोग्राफीचे धडे घेत आहेत. दोघे जीबी रोडवर राहाणार्‍या महिलांचे फोटो काढतात. दोघांनी फोटोमधून सेक्स वर्कर्सचे आयुष्य दाखवतात. आतापर्यंत हे आयुष्य कोणी पाहिले नसेल.

  जीबी रोडवर जन्मलेल्या मुलांनी सेक्स वर्कर्सच्या घरातील काढलेली फोटो पाहाण्यासाठी पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करा...

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  जीबी रोडवर राहाणारा निमिष आणि अर्जुनला उंच भरारी घ्यायची आहे. दोघांना फोटोग्राफर व्हायचे आहे.

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  निमिषची आईही सेक्स वर्कर आहे. त्यामुळे तो फॅमिलीविषयी कुठे काही जास्त बोलत नाही.

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या वाट्यालाही असेच खाचखडग्याचे जीवन येते.

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  'स्कूप्व्हूप'च्या फोटोग्राफर्सनी दिल्लीतील सेक्स वर्कर्सच्या मुलांशी संवाद साधला. त्यांचे दु:ख जाणून घेतले.

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  काळोखात प्रकाश शोधण्याचा प्रयत्न करत आहेत सेक्स वर्कर्सची मुले

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  अर्जुनने नवी सुरुवात करण्‍याचा निर्णय घेतला. आता अर्जुन स्वाभिमानाचे आयुष्य जगतोय.

 • Inside Photos Of Brothels In GB Road Clicked By Children Of Sex Workers

  आपल्या फोटोच्या माध्यमातून जनजागृती करताना सेक्स वर्कर्सची मुले.

Trending