आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपिका-रणवीरचे पाहूणे ज्या रिसॉर्टमध्ये थांबले आहे, तेथील एका दिवसाचे भाडे आहे 24 लाख, यांनी बुक केल्या सर्व रुम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोणचे लग्न 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीच्या लेक कोमोमध्ये आहे. यासाठी 9 नोव्हेंबरच्या रात्रीच ते मुंबईमधून इटलीला रवाना झाले. रिपोर्ट्सनुसार रणवीर आणि दीपिका लेक कोमोच्या ईस्टमध्ये ब्लेविओ गांवच्या लग्जरी रिसॉर्टमध्ये थांबले आहेत. या रिसॉर्टमध्ये 75 खोल्या आणि 4 रेस्तरॉ बार आणि लेक व्ह्यूसोबतच एक एल फ्रेस्को टेरेस आहे. 


प्रत्येक दिवसाचा 24 लाखांपेक्षा जास्त भाडे देत आहे रणवीर-दीपिका 
- रिसॉर्टमध्ये 4 कॉन्फ्रेंस रुम, स्पा, इंडोर स्विमिंग पूल आणि आउटडोर फ्लोटिंग पूलही आहे. येथील एका रुमची एव्हरेज कॉस्ट 400 यूरो म्हणजेच जवळपास 33,000 रुपये प्रत्येक दिवसाचे आहेत. दीपिका आणि रणवीरने सर्व 75 रुम बुक केले आहेत. यामुळे ते प्रत्येक दिवशी 24,75,000 रुपये रिसॉर्टवर खर्च करत आहेत. दीपिका आणि रणवीर आपल्या फॅमिली मेंबर्ससोबत 17 नोव्हेंबरपर्यंत येथे राहतील. म्हणजेच तेव्हापर्यंत जवळपास 1 कोटी 73 लाख 25 हजार रुपये खर्च करावे लागतील. रिपोर्ट्सनुसार या रिसॉर्टमधून वेटिंग वेन्यूपर्यंत पोहोचण्यासाठी जवळपास 45 मिनिटे वेळ लागतात. विशेष म्हणजे हे रिसॉर्ट बुक करण्याची शेवटची तारीख 17 नोव्हेंबर आहे. म्हणजेच यानंतर रिसॉर्ट बंद होईल. हे नंतर पुन्हा मार्चमध्ये ओपन होईल.

 

बातम्या आणखी आहेत...