आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमान नव्हे, नेहमीच ट्रेनने परराष्ट्र दौरे करतात किम जोंग उन; आत आहेत अशा सुविधा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंटरनॅशनल डेस्क - जगातील सर्वात एक्कलकोंडा देश उत्तर कोरियाचे सुप्रीम लीडर चीन दौऱ्यावर आहेत. क्वचितच देशाबाहेर निघणारे किम विमानाने प्रवास करत नाहीत. विमानावर हल्ला होण्याची त्यांना भीती आहे. आपल्या वडील आणि आजोबांप्रमाणेच ते ट्रेनने परराष्ट्र दौरे करतात. चीनच नव्हे, तर रशियात सुद्धा ते ट्रेननेच जातात. त्यांच्या प्रत्येक दौऱ्यात ही खास आणि आलीशान ट्रेन चर्चेत असते. गतवर्षी मे महिन्यात त्यांनी परराष्ट्र दौरा करताना आपली खास ट्रेन माध्यमांना दाखवली होती. किम जोंग उन यांच्या घराण्याची ही स्पेशल ट्रेन बुलेटप्रूफ आहे. हळूवार गतीने चालणाऱ्या या ट्रेनमध्ये ड्रिंक, सागरी, कॉन्टिनेंटल फूड, आणि पोर्कसह सर्वच प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.


ही आहेत स्पेशल ट्रेनची वैशिष्ट्ये... 
> या ट्रेनमध्ये 21 आलीशान डबे आहेत. यात सफर करणाऱ्यांना खास फ्रेन्च वाइन, झिंगे आणि मासे यांच्यासह पोर्क (डुकराचे मांस) दिले जाते. किम जोंग उन यांच्या ट्रेनमध्ये कथितरीत्या मनोरंजनासाठी खास महिला आहेत. त्यांना लेडी कंडक्टर्स असे म्हटले जाते.
> प्रत्यक्षात ही ट्रेन तीन भागांमध्ये विभागली जाते. त्यातील पहिल्या भागात नेता, दुसऱ्या भागात अत्याधुनिक सिक्यॉरिटी आणि तिसऱ्या ट्रेनमध्ये अतिरिक्त सुरक्षा रक्षक व इतर साहित्ये असतात. या ट्रेनचा प्रत्येक डबा बुलेटप्रूफ असल्याने वजन जास्त आहे. तसेच ही रेल्वे ताशी फक्त 60 किमी इतक्या गतीने धावते.
> रशियातील एका अधिकाऱ्याने 2011 मध्ये किम घराण्याच्या रेल्वेत प्रवास केला होता. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. या ट्रेनमध्ये रशिया, चीन, जपान आणि फ्रेन्च डिश उपलब्ध आहेत.
> ही ट्रेन आरामदायक बनवण्यासाठी खास पद्धतीने डिझाईन करण्यात आली आहे. यात आरामदायक सोफे आणि बेड आहेत. प्रत्येक डब्यात टीव्ही स्क्रीन आहेत. प्रवास अल्हाददायक बनवण्यासाठी सर्व प्रकारच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...