आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘इन्साइट प्राेब’ 48.2 काेटी किमी अंतर कापून मंगळावर, संदेश पाठवला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाॅशिंग्टन - अमेरिकी अंतराळ संशाेधन संस्था नासाचे ‘इन्साइट’ लँडर यान यशस्वीरीत्या मंगळ ग्रहावर उतरले. भारतीय वेळेनुसार साेमवार-मंगळवारी रात्री सुमारे १.२४ मिनिटांनी त्याचे लँडिंग झाले. कॅलिफाेर्नियाच्या पासाडेनातील नासाच्या जेट प्राेपल्शन प्रयाेगशाळेच्या उड्डाण नियंत्रकांनी हे यान मंगळावर याेग्य रीतीने उतरल्याची घाेषणा करताच या प्रकल्पात सहभागी वैज्ञानिकांनी उत्साहित हाेत अानंदाने टाळ्या वाजवल्या. या यानाने सुमारे सात महिन्यांत ४८.२ काेटी किमीचे अंतर कापून हा प्रवास पूर्ण केला.

 

मंगळाच्या कक्षेत प्रवेश करताना यानाचा वेग १९ हजार ८०० किमी प्रतितास हाेता, तर लंँडिंग करण्यासाठी ६ मिनिटे व ३२ सेकंदात चार टप्प्यांत हा वेग ८ किमीपर्यंत अाणला गेला. मंगळावर पाेहाेचताच यानाने मंगळवारी सकाळी ‘त्याचे साैर पॅनल उघडे असून, त्यावर ऊन पडलेले अाहे’ असा संदेश पाठवला.

 

- रात्री १.१० मिनिटांनी यान क्रूझपासून वेगळे हाेणे सुरू.

- १.१७ वाजता मंगळाच्या कक्षेत. वेग १९ हजार ८०० किमी. 

- १.१९ वाजता १,५०० अंश तापमान.भीषण उष्णतेमुळे यानाचे रेडिअाे सिग्नल न मिळण्याचा धाेका हाेता. 

- १.२१ वाजता यानाचे पॅराशूट उघडू लागले. त्यानंतर यानाला उष्णतेपासून वाचवणारे हीट शील्ड हटले.  

- १.२३ वाजता लँडिंग करण्यासाठी यानाचे पाय उघडून पॅराशूट वेगळे झाले, तर १.२४ मिनिटांनी यानाने मंगळाला स्पर्श केला.  
-  १.२३ वाजता इन्साइट लँडरने मंगळाच्या पृष्ठभागास स्पर्श केला. 

 

‘मंगळाची निर्मिती कशी झाली’ हे सांगणार

- एखाद्या ब्रीफकेससारखा अाकार असलेल्या इन्साइटचे साैरऊर्जा व बॅटरीवर चालणारे हे यान २६ महिने काम करेल.

- प्रकल्पाचे संशोधक ब्रूस बॅनर्ट म्हणाले, हे एकप्रकारचे टाइम मशीन आहे. ४.५ अब्ज वर्षांपूर्वी मंगळ, पृथ्वी व चंद्रासारखे दगडी ग्रह कसे बनले ? 

- यानावर सिस्माेमीटर(भूकंपमापी) अाहे. ते फ्रेंच अंतराळ संस्थेने बनवले. हे उपकरण मंगळाच्या अंतर्गत हालचालींची नाेंद घेईल.

बातम्या आणखी आहेत...