आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडून निफाडच्या उध्वस्त द्राक्षबागांची पाहणी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ओझर- निफाड तालुक्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे उध्वस्त झालेल्या द्राक्षबागांची पाहणी  नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी (दि.3 नोव्हेंबर) रोजी सकाळी केली. तसेच, ओझर येथे द्राक्ष बागायतदार संघाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसानीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्याचा निर्णय मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. तसेच प्रत्यक्ष स्थितीचे अवलोकन करून मदतीचा तपशील लवकरच ठरवावा, असे निर्देश गिरीष महाजन यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी विमा कंपन्यांकडून सुद्धा मदत देण्यासंबंधी सरकार त्यांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, पंचनाम्यांच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला असून, मोबाईलने घेतलेल्या छायाचित्रांना परवानगी देण्यात आली आहे आणि लवकर मदत मिळावी यासाठी आम्ही केंद्र सरकारला विनंती करत असल्याचे ते म्हणाले. मुंबईला मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थीतीत द्राक्ष बागायतदार संघाची बैठक येत्या  2-3 दिवसात घेतली जाईल आणि त्या बैठकीला द्राक्ष बागातदार संघाचे प्रतिनिधी सोबत बोलवू असे गिरीष महाजन यांनी सांगितले.
त्यानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी निफाड तालुक्यातील पाचोरेवणी, शिरवाडे वणी येथील उध्वस्त द्राक्षबागांची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी शेतकऱ्यांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यथा मांडत संपूर्ण कर्जमाफीची मागणी केली. यावेळी खा.भारती पवार, आ.देवयानी फरांदे, आ.सीमा हिरे, आ.दिलीप बनकर, आ. राहुल ढिकले, माजी आमदार अनिल कदम, कृषी सचिव एकनाथ डवले, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.