आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुरुंगात मिळाले 3 मेलेले उंदीर, अधिकाऱ्यांना आधी वाटली सामान्य घटना, जेव्हा उंदराच्या पोटावर दिसल्या सर्जरीच्या खुणा तेव्हा आली शंका 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन : ब्रिटनमध्ये गुन्हेगारांनी तुरुंगात बंद असलेल्या कैद्यांना मदत करण्यासाठी एक नवा मार्ग शोधून काढला आहे. येथे एक तुरुंगात अधिकाऱ्यांना तीन मेलेले उंदीर मिळाले. त्यांना आधी ती एक सामान्य घटना वाटली पण जेव्हा त्यांनी उंदराच्या पोटावर सर्जरीच्या खुणा पहिल्या तेव्हा त्यांना शंका आली आणि त्यानंतर उंदरांचे पोट उघडले गेले. तर त्यातून अनेक बेकायदेशीर वस्तू मिळाल्या. हे सामान मेलेल्या उंदरांद्वारे तुरुंगात कैद्यांसाठी फेकले गेले होते. लोकल मीडियानुसार, क्रिमिनल ऑर्गेनायजेशन हे काम गेल्या अनेक दिवसांपासून करत आहे. 

काय काय मिळाले उंदरांमध्ये...?
- अधिकाऱ्यांना आता त्याविषयी कळाले, जेव्हा साउथ-वेस्ट इंग्लंडच्या डोरसेटमधील एका तुरुंगात मेलेले उंदीर मिळाले. त्यांच्या पोटातून पोलिसांना मोबाइल फोन, चार्जर, सिम कार्ड आणि सिगारेट पेपर मिळाले. पोलिसांना गांजा आणि तंबाकूसह खूप प्रमाणात सिंथेटिक ड्रग्सदेखील मिळाले. 

तुरुंगाची सुरक्षा वाढवणे गरजेचे आहे... 
- ब्रिटनचे प्रिजन मिनिस्टर रोरी स्टीवर्ट यांच्यानुसार, याच्यामुळे हे कळते की, गुन्हेगार त्यांच्या साथीदारांना ड्रग्स पोहोचवण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. 
- ते म्हणाले की, ब्रिटनच्या तुरुंगाची सुरक्षा व्यवस्था वाढवणे आता अधिकच गरजेचे झाले आहे. मात्र मिनिस्टरने हे सांगितले नाही की, ते उंदीर तुरुंगात आले कसे. 

नशेत दिसत आहेत तुरुंगातील कैदी... 
- अधिकाऱ्यांच्यानुसार, यापूर्वीही गुन्हेगारांनी जेलमध्ये बेकायदेशीर वस्तू पाठवण्यासाठी वेगवेगळे मार्ग काढले आहेत. यामध्ये टेनिस बॉल, कबूतर आणि ड्रोन्सचा वापर सामील आहे.  
- मात्र अशामुळे आता तुरुंगात व्यसनी लोकांची संख्या वाढत आहे. मागच्यावर्षी मार्चमध्ये जिथे 20 टक्के कैद्यांची ड्रग रिपोर्ट्स पॉझिटिव्ह होत्या.  
- तिथे या 12 महिन्यांमध्ये ही संख्या 23 टक्के वाढली आहे.