आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

93 वर्षीय वृद्ध महिलेवर दोन तरुणांनी ठेवली नजर; प्रत्येक हालचाल टिपली बारकाईने, मग जे घडले...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हंट्सविले- सध्या अमेरिकेत राहणाऱ्या दोन तरुणांनी केलेल्या कामामुळे त्यांच्यावर चौफेरहुन कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोडनी स्मिथ आणि त्याचा बेस्ट फ्रेंड टॅरेंस स्ट्ररोय असे या तरुणांचे नाव असून त्यांच्या घराजवळच एक 93 वर्षांची वृद्ध महिला एकटी राहत होती. ती एकटी असल्याने एवढ्या वयातही तिला सर्व कामे करावी लागत होती. एके दिवशी या दोघांनी जेव्हा त्या वृद्ध महिलेला आपल्या गार्डनमध्ये काम करताना पाहिले. महिलेचे हाल पाहून स्मिथ आणि स्ट्ररोय यांनी त्या महिलेला मदत करण्यास सुरुवात केली. महिलेला मदत केल्यानंतर स्मितने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहली. त्यानंतर या पोस्टला लाखो लोकांनी शेअर केली.

 

फेसबुकवर लिहली भावनिक पोस्ट 

> वृद्ध महिलेला मदत केल्यानंतर स्मितने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहली. त्यात त्याने लिहले की,'आज आम्ही या 93 वर्षीय वृद्ध महिलेच्या बागेत सफाई केली. आम्ही तिच्या घराबाहेरुन जात असताना या आजींना काम करताना पाहिले. त्यांना काम करताना पाहून आम्हाला न रहावल्याने आम्ही त्यांना मदत करण्याचे ठरवले. त्यांना या वयातही काम करताना पाहून आम्हाला खुप वाईट वाटले. या आजींना आमच्याकडून थोडीतरी मदत व्हावी म्हणुन आता आम्ही दर दोन आठवड्यांनंतर या वृद्ध महिलेच्या घरी जाऊन त्यांच्या बागेतील सफाई करण्याचा निर्धार केला आहे.'
> स्मिथने ही भावनिक पोस्ट शेअर केल्यानंतर काही आठवड्यानंतरच त्या पोस्टला अडीच लाखांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केले. अनेक लोकांनी या दोघांवर कौतुकाचा वर्षावही केला.
> या घटनेनंतर प्रेरित होऊन या दोघांनी 'रायझिंग मॅन लॉन केअर' नावाने लॉन केअर सर्व्हिस सुरू केली आहे. ही कंपनी त्या वृद्ध महिलेसारख्याच इतर बेसहारा लोकांना मदत करणार आहे. 
> सुरवातीला स्मिथने 40 लॉनची सफाई करण्याचे ठरवले होते. परंतु दोन महिन्यांच्या आतच त्यांना दोनशेहून अधिक सफाईचे काम मिळाले. आता या कामातून त्यांना काही पैसेही मिळत असल्याने दोघांनीही हे काम असेच सुरू ठेवण्याचे ठरवले आहे.

 

बातम्या आणखी आहेत...