आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inspiration Story, Motivational Story, Life Management

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एका माणसाला खुप राग यायचा, तो एका संताकडे गेला, संतांनी त्याची समस्या ऐकली आणि त्याला दोन्ही हातांच्या मुठ्ठी बांधायला लावली, एवढे केल्यानेच त्याची समस्या दूर झाली

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. एका गावात रामा नावाचा एक माणुस राहायचा. तो छोट्या-छोट्या गोष्टींवर चिडायचा. दूस-यांवर राग काढायचा. कुटूंबातील लोक त्याच्या अशा वागण्यामुळे चिंतेत राहायचे. वेळेसोबतच त्याचा राग वाढत होता. रामाच्या व्यवहारामुळे नातेवाईक आणि मित्र त्याच्यासोबत बोलायचे नाही. एक दिवस गावात एक विद्वान संत आले. त्यांची चर्चा पुर्ण गावात होऊ लागली. रामाला वाटले की, हे संत त्याची समस्या दूर करु शकतील. रामा एक दिवस एकटाच त्यांना भेटण्यासाठी गेला आणि आपली समस्या सांगितली. संताने रामाला सांगितले की, मी जसे म्हणेल, तु तसेच कर. रामा म्हणाला ठीक आहे. संत म्हणाले की- आपल्या दोन्ही हातांच्या मुठ बंद कर. रामाने तसेच केले. यानंतर संत म्हणाले आता दोन्ही हातांची मुठ लगेच उघड. रामाने तसेच केले. संतांनी ही प्रक्रिया वारंवार करण्यास सांगितली. संत असे का सांगत आहेत हे रामाला कळाले नाही. 


खुप वेळ असे केल्यानंतर रामाने संताला म्हटले की, मुठ्ठी उघडल्याने आणि बंद केल्याने माझी समस्या कशी दूर होईल? संताने प्रेमाने त्याला समजावत सांगितले की, तु तुझी मुठ स्वतः बंद केली आणि स्वतः उघडली. म्हणजे तुझे तुझ्या अंगावर पुर्ण नियंत्रण आहे. 
त्याचप्रमाणे तुला राग आला, तर तु स्वतःच त्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे. दूसरा कुणी तुझी मदत करु शकत नाही. ज्या दिवशी तुझे विचारांवर नियंत्रण असेल, त्या दिवशी तु चिडचिड करणे सोडून देशील. रामाला संताच्या गोष्टी समजल्या आणि त्यांने स्वतःवर नियंत्रण करण्याची सवय सुरु केली. 

 

लाइफ मॅनेजमेंट 
जीवनात अनेक समस्या असतात, ज्या आपण स्वतः दूर करु शकतो, पण आपल्याला करायच्या नसतात. आपल्याला वाटते की, आपल्या समस्या दूसरे कुणीतरी येऊन ठिक कराव्या. असा विचार करुन आपण त्या समस्या वाढण्याची संधी देतो. अनेक वेळा समस्या जास्त गंभीर होते. यामुळे योग्य वेळी आपल्या समस्यांवर उपाय शोधा.