प्रेरक व्यक्तिमत्व / 'रमेशचंद्र अग्रवाल - दैनिक भास्कर के शिल्पकार की गाथा' पुस्तकाचे प्रकाशन

प्रकाशन समारंभात डावीकडून भास्कर समूहाचे डायरेक्टर गिरीश अग्रवाल, विशाल अग्रवाल, लेखिका भारती एस. प्रधान, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, मुख्यमंत्री कमलनाथ, भास्कर समूहाचे एमडी सुधीर अग्रवाल आणि डेप्युटी एमडी पवन अग्रवाल. प्रकाशन समारंभात डावीकडून भास्कर समूहाचे डायरेक्टर गिरीश अग्रवाल, विशाल अग्रवाल, लेखिका भारती एस. प्रधान, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, मुख्यमंत्री कमलनाथ, भास्कर समूहाचे एमडी सुधीर अग्रवाल आणि डेप्युटी एमडी पवन अग्रवाल.

दै. भास्करच्या रूपात रमेशजींनी मध्य प्रदेशला प्रतिष्ठा मिळवून दिली : कमलनाथ

दिव्य मराठी वेब टीम

Dec 01,2019 09:45:36 AM IST

भोपाळ - दैनिक भास्कर समूहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांच्या ७५ व्या जन्मदिनी आयोजित प्रेरणा उत्सवात' मुख्यमंत्री कमलनाथ, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान व इंडिया टीव्हीचे संपादक व संचालक रजत शर्मा यांनी भास्कर परिवाराशी असलेल्या नात्याच्या स्मृती जागवल्या. संस्कार व्हॅली स्कूलमध्ये झालेल्या समारंभात रमेशचंद्र अग्रवाल -दैनिक भास्कर के शिल्पकार की गाथा' पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. कमलनाथ म्हणाले, रमेशजींनी भास्कर समूहासोबत मध्य प्रदेशलाही ओळख मिळवून दिली. आज दै. भास्करच्या रूपाने मध्य प्रदेशला ओळखले जाते. सकारात्मक विचार व जोखीम घेण्याची क्षमता हे रमेशजींच्या यशामागे मुख्य सूत्र होते. अपयशाला न घाबरता कार्यरत राहणे हे त्यांचे कौशल्य होते.

शिवराजसिंह चौहान म्हणाले, मी विद्यार्थी नेता ते मुख्यमंत्री होईपर्यंत कधीच रमेशजींच्या चेहऱ्यावर राग पाहिला नाही. त्यांना कधीच अहंकार नव्हता. ते कायम विनम्रता बाळगून राहिले.


रजत शर्मा म्हणाले, रमेशजींचा हसतमुख चेहरा खऱ्या अर्थाने मध्य प्रदेशच्या सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब होते. पत्रकारिता असो, व्यापार असो किंवा समाजसेवा या प्रत्येक क्षेत्रात ते सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करत राहिले.


भास्कर समूहाचे संचालक गिरीश अग्रवाल म्हणाले, रमेशजींच्या जीवन मूल्यांतून इतर लोकांनीही प्रेरणा घ्यावी हा आमचा प्रयत्न आहे. म्हणूनच त्यांच्या जीवन प्रवासाला आम्ही पुस्तकाचे रूप दिले आहे.


पुस्तकाच्या लेखिका भारती एस. प्रधान म्हणाल्या, रमेशजींच्या जीवनावर लिहित असतानाच मला दैनिक भास्करने हिंदी पत्रकारितेला मिळवून दिलेल्या उंचीची जाणीव झाली. समारंभात शेवटी दैनिक भास्कर परिवाराच्या वतीने विशाल अग्रवाल यांनी सर्व पाहुण्यांसह उपस्थितांचे आभार मानले. मंजुल पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेले हे पुस्तक विक्रीसाठी मंजुल पब्लिशिंगची वेबसाइट www.manjulindia.com सह www.amazon.in वरही उपलब्ध आहे.


पुस्तकातील अंश...


ही एक चॅम्पियनची गाथा आहे, एक चमत्काराची कहाणी...

कौटुंबिक मालकी असलेल्या एका छोट्या वृत्तपत्राला त्यांनी अवघ्या ३५ वर्षांत वाचकांची पहिली पसंत बनवले. आज १२ राज्ये व ६४ आवृत्त्यांत हे वृत्तपत्र आवडीने वाचले जात आहे. ५ हजार कोटींच्या उलाढालीचे मोठे साम्राज्य त्यांनी उभे केले. कुटुंब, समाज जोडण्यासोबतच यासंबंधीच्या तत्त्वज्ञानासोबत हिंदी वृत्तपत्र जगतात त्यांनी घडवून आणलेली क्रांती त्यांचे सर्वात मोठे यश आहे. हिंदीचे अत्यंत शुद्ध साहित्यिक रूप त्यांनी वाचकांसाठी लोकप्रिय आणि बोली भाषेतील शब्दांनी युक्त अशा भाषेत बदलले. हिंदी वृत्तपत्रांना त्यांनी सन्मान मिळवून दिला. जीवनभर एका चॅम्पियनसारखे ते मैदानात पाय रोवून होते. ही एका चॅम्पियनची गाथा आहे. ही एका चमत्काराची कहाणी आहे...

X
प्रकाशन समारंभात डावीकडून भास्कर समूहाचे डायरेक्टर गिरीश अग्रवाल, विशाल अग्रवाल, लेखिका भारती एस. प्रधान, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, मुख्यमंत्री कमलनाथ, भास्कर समूहाचे एमडी सुधीर अग्रवाल आणि डेप्युटी एमडी पवन अग्रवाल.प्रकाशन समारंभात डावीकडून भास्कर समूहाचे डायरेक्टर गिरीश अग्रवाल, विशाल अग्रवाल, लेखिका भारती एस. प्रधान, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, इंडिया टीव्हीचे संपादक रजत शर्मा, मुख्यमंत्री कमलनाथ, भास्कर समूहाचे एमडी सुधीर अग्रवाल आणि डेप्युटी एमडी पवन अग्रवाल.
COMMENT