आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

यशस्वी आणि सुखी राहायचे असल्यास नेहमी लक्षात ठेवा फ्रँकलिन यांच्या 10 गोष्टी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बेंजामिन फ्रँकलिन अमेरिकेतील महान लोकांमधील एक होते. ते महान लेखक, शास्त्रज्ञ, दार्शनिक, राजनेता होते. बेंजामिन फ्रँकलिन यांचा जन्म 17 जानेवारी 1706 मध्ये झाला होता. मृत्यू 17 एप्रिल 1990 मध्ये झाला. फ्रँकलिन संगीत ऐकल्याशिवाय राहू शकत नव्हते. याच कारणामुळे त्यांनी 1761 मध्ये ग्लास हार्मोनिक बनवली. ग्लास हार्मोनिक ओल्या हातांनी रगडल्यास मधुर ध्वनी निघतो. येथे जाणून घ्या, आयुष्य सुखी करणाऱ्या बेंजामिन फ्रँकलिन यांच्या 10 गोष्टी..


1. संतोष गरिबांना श्रीमंत बनवतो, असंतोष श्रीमंतांना गरीब बनवतो.


2. मासा आणि पाहुणे, तीन दिवसानंतर अप्रिय वाटू लागतात.


3. हसमुख चेहरा एखाद्या रुग्णासाठी तेवढाच लाभदायक आहे, जेवढा की स्वस्थ ऋतू.


4. मुंगीपेक्षा दुसरा चांगला उपदेशक नाही, कारण मुंगी काम करतानाही शांत राहते.


5. एखादा व्यक्ती स्वतःचे धन ज्ञान अर्जित करण्यासाठी खर्च करत असेल तर त्याचे ज्ञान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. ज्ञानासाठी करण्यात आलेली गुंतवणूक नेहमी चांगले प्रतिफळ देते. 


6. धनामुळे आजपर्यंत कोणालाही आनंद मिळाला नाही आणि मिळणारही नाही, व्यक्तीकडे जेवढे अधिक धन असेल त्याला त्यापेक्षा जास्त धनाची इच्छा असते. धन रिक्त स्थान भरण्याऐवजी शून्यता निर्माण करते.


7. ज्ञानामध्ये गुंतवणूक केल्यास सर्वात जास्त व्याज मिळते.


8. क्रोधापासून सुरु झालेली प्रत्येक गोष्ट, पश्चातापावर समाप्त होते.


9. जीवनातील सर्वात दुःखी गोष्ट म्हणजे आपण मोठे तर लवकर होतो परंतु समजूतदार उशिराने होतो.


10. तुम्ही थांबू शकता परंतु काम कधीही थांबत नाही.