आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकजुटीने राहिल्यास मोठ्यातील-मोठ्या आणि ताकदवान शत्रूला पराभूत केले जाऊ शकते 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोककथेनुसार, प्राचीन काळी एक साप स्वतःला खूप ताकदवान समजायचा. सापाच्या बिळाजवळच मुंग्यांचे एक वारूळ होते. साप दररोज बिळातून निघताना मुंग्यांच्या वारुळाचे नुकसान करायचा आणि असंख्य मुंग्या खायचा. या गोष्टीमुळे मुंग्या खूप त्रस्त झाल्या होत्या.


> एके दिवशी सर्व मुंग्यांनी काही काटे गोळा करून आणले आणि सापाच्या बिळाजवळ टाकले. साप नेहमीप्रमाणे बिळाच्या बाहेर निघताच काट्यांमुळे त्याच्या शरीरावर छोट्या-छोट्या जखमा झाल्या. त्यानंतर मुंग्यांनी त्या जखमांवर हल्ला केला.


> मुंग्यांच्या हल्ल्यामुळे सापाला असह्य वेदना होऊ लागल्या. सापाने अनेक मुंग्या खाऊन टाकल्या परंतु मुंग्यांची संख्या जास्त होती. छोट्या-छोट्या जखमा मुंग्यांच्या हल्ल्यामुळे वाढल्या होत्या. मुंग्या सापाचे मांस खाऊ लागल्या. काही वेळातच सापाचा मृत्यू झाला. सर्व मुंग्यांनी एकत्र येऊन विशाल सापाची शिकार केली.


कथेची शिकवण
> या कथेची शिकवण अशी आहे की, कोणालाही लहान समजू नये. आपला शत्रू मोठा आणि ताकदवान असेल तर त्याचा सामना एकजुटीने केला जाऊ शकतो. आपण एकत्र येऊन एखाद्या शत्रूचा सामना केला तर त्याचा प्रभाव निश्चित आहे.

बातम्या आणखी आहेत...