आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणादायी गोष्ट : वैद्य लुकमान यांनी आपल्या मुलाला शिकवण देण्यासाठी धुपदान, चंदन कोळसा आणण्यासाठी सांगितले..त्यानंतर जे घडले ते पाहून मुलगाही गोंधळला...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रेरणादायी गोष्ट- तुम्ही वैद्य लुकमान यांच्याविषयी अनेकदा ऐकले असेल. त्यांच्याकडे जवळपास सर्व रोगांचे उपचार उपलब्ध होते. अतिशय बुद्धीमान व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. आज आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्यातील एक खास प्रसंग सांगणार आहोत. ज्या प्रसंगात त्यांनी आपल्या मुलाला चांगल्या- वाईटाचे महत्व सांगितले होते.

 

वैद्य लुकमान आपल्या आयुष्याचे शेवटचे क्षण मोजत असताना त्यांनी आपल्या मुलाला शिकवण देण्याचे ठरवले. मुलाला बोलावल्यानंतर त्यांनी त्याला धुपदान आणण्यासाठी खुणावले. मुलाला लक्षात येताच त्याने धुपदान आणि मुठभरुन चंदनाची भुकटी आणली. त्यानंतर लुकमान यांनी त्याला कोळसा आणण्यासाठी खुणावले. मुलाने लगेच दुसऱ्या हातात कोळसा आणला. त्यानंतर वैद्य लुकमान यांनी त्याला चंदन आणि कोळसा फेकण्यासाठी सांगितले. मुलाने दोन्ही वस्तू फेकताच लुकमान यांनी त्याला प्रश्न विचारला की 'तुझ्या दोन्ही हातांत आता काय शिल्लक आहे?' 

 

लुकमान यांनी प्रश्न विचारताच मुलगा म्हणाला, 'आता माझ्या हातात काहीच नाही, दोन्ही हात रिकामे आहे.' त्यावर लुकमान म्हणाले, 'नाही तुझ्या हातांचे व्यवस्थित निरीक्षण कर. हातांचे निरीक्षण करताना मुलाच्या लक्षात आले की त्याच्या एका हातात चंदनाचा सुगंध आणि दुसऱ्या हाताला कोळश्याचा रंग लागला होता. 


त्यावेळेस वैद्य लुकमान मुलाला म्हणाले, 'चंदनाची भुकटी चांगल्या लोकांसारखी असते. हे लोक जिथे जातात तिथे आपल्या गुणांमुळे ओळख निर्माण करतात. तर काही लोक हे कोळश्यासारखे असतात. त्या लोकांसोबत जे राहतात त्यांच्यावरदेखील तसेच परिणाम होतात.' 

 

शिकवण
या प्रसंगातून आपल्याला शिकवण मिळते की, आपण नेहमी चांगल्या लोकांची संगत धरावी. जर आपण वाईट लोकांसोबत राहीलो तर त्यांच्याप्रमाणेच आपल्यावर वाईट परीणाम होतील. 

 

बातम्या आणखी आहेत...