Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | inspirational story about king and sadhu

जे लोक दुसऱ्यांच्या संपत्तीवर वाईट नजर ठेवतात, ते लोक कधीच सुखी राहू शकत नाहीत

रिलिजन डेस्क | Update - May 11, 2019, 12:05 AM IST

एका साधूंना सुवर्ण मुद्रा सापडते आणि ती मुद्रा एखाद्या गरीब व्यक्तीला द्यावी असे ते ठरवतात, काही दिवसांनी साधू एका राजाला ती सुवर्ण मुद्रा देतात...साधूंनी असे का केले असावे?

 • inspirational story about king and sadhu

  ही एक पुरातन काळातील गोष्ट आहे. एक संत गावोगावी जाऊन प्रवचन देत असत. ते कधीच एका ठिकाणी थांबायचे नाही. संत आपल्या प्रवचनात लोकांना सुखी आयुष्याचा मार्ग सांगायचे. एक दिवस असेच चालत असताना वाटेत त्यांना एक सुवर्ण मुद्रा सापडली. गुरूंनी ती मुद्रा उचलली आणि त्यांना वाटले की, एखाद्या गरीब व्यक्तीला आपण ही मुद्रा देऊया, असा विचार करून संत पुढे निघाले.

  संत बऱ्याच दिवसांपासून गरीब व्यक्तीचा शोध घेत होते, पण त्यांना असा व्यक्ती मिळाला नाही. यानंतर असेच काही दिवस गेले. एक दिवस संताना दिसले की, राजा आपल्या सैन्यासोबत शेजारच्या राज्यावर हल्ला करण्यासाठी जात आहे. तेव्हा गुरू राजाजवळ गेले आणि तो सोन्याचा शिक्का राजाला दिला. कल्पना नसतानाही असे कृत्य घडल्यामुळे राजा आश्चर्यचकित झाला. राजाने संतांना विचारले की, गुरूजी आपण ही सुवर्ण मुद्रा मला का देत आहात. यावर संत राजाला म्हणाले की , महाराज मला ही मुद्रा काही दिवसापुर्वी सापडली होती, तेव्हा मी विचार केला होता की आपण एखाद्या गरीब व्यक्तीला ही सुवर्ण मुद्रा द्यावी आणि आज मला आपल्या रूपात तो व्यक्ती दिसला.


  हे ऐकून राजाला खूप राग आला आणि तो संताला म्हणाला, मी या राज्याचा राजा आहे, माझ्याकडे धन-संपत्तीची काहीच कमी नाही आणि तुम्ही मला गरीब म्हणत आहात. यावर संत राजाला म्हणाले महाराज, जो मनुष्य एवढी धन-संपत्ती असूनही दुसऱ्या राज्यावर हल्ला करून त्याची धन-संपत्ती लूटण्यासाठी जात आहे, त्याला आपण गरीब नाही तर काय म्हणणार. राजाला संताची गोष्ट समजली, त्याला आपल्या वागण्याचे वाईट वाटले. राजाने संतांना प्रणाम केला आणि आपले सैन्य घेऊन आपल्या राज्यात परतला.


  कथेची शिकवण
  कधीही कोणाच्या संपत्तीवर वाईट नजर ठेऊ नये. नेहमी आपल्या मेहनतीने कमवलेल्या पैशातच संतूष्ट राहायला पाहिजे. संतूष्ट व्यक्तीच सर्वात सुखी असतो.

Trending