आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेरक कथा : महानता उंचीने नाही तर चांगल्या विचारांनी मिळते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका राज्यात एक प्रसिद्ध संत आले. राजाला जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने सेनापतीला संतांना सन्मानाने राजदरबारात घेऊन येण्याचा आदेश दिला. सेनापती लगेच शाही रथ घेऊन संताकडे आले आणि नमस्कार करून राजदरबारात येण्याचे निमंत्रण देत म्हणाले की, गुरूदेव, महाराजांना आपल्याला भेटायचे आहे. राजाच्या सन्मानपुर्वक निमंत्रणाने संतांना खूप आनंद झाला. राजाचे निमंत्रण स्विकारून संत राजदरबारात जाण्यासाठी तयार झाले आणि रथात जाऊन बसले.


संत उंचीने लहान असल्यामुळे सेनापती त्यांना पाहून सारखा हसत होता. सेनापतीला वाटले की, महाराज उंचीने संतापेक्षा मोठे आहेत. एवढ्या ठेंगण्या व्यक्तीसोबत महाराज कशी चर्चा करणार. सेनापतीकडे पाहून संताला कळाले हे माझ्या ठेंगण्यापणामुळे हसत आहेत. त्यांनी सेनापतीला विचारले आपण एवढे का हसताय, त्यावर सेनापती म्हणाले गुरूदेव मला माफ करा मी आपल्या ठेंगणेपणामुळे हसतोय. महाराज उंच आहेत आणि त्यांच्यासोबत बोलण्यासाठी तूम्हाला उंच आसनावर बसावे लागेल.


त्यावर संताने हसून सेनापतीला उत्तर दिले की, मला मोठ्या आसनाची काहीच गरज नाही. मी खाली उभे राहून राजासोबत चर्चा करेल. माझ्या लहान उंचीचा फायदा हा आहे की, मी राजाला ताठ मानेने आणि सरळ बोलू शकतो पण राजाला मला बोलण्यासाठी मान खाली करून बोलावे लागेल. संतांच्या या उत्तराने, सेनापतीला आपली चुक समजली आणि त्यांनी संताची माफी मागितली, त्याला समजले की महानता उंचीने नाही तर चांगल्या विचारांनी मिळते.


कथेची शिकवण
कोणात्याही व्यक्तीच्या शारीरिक उंचीवरून त्याची योग्यता पारखणे चुकीचे आहे. लहान उंचीचे लोकसुद्धा आपल्या विचारांनी आणि ज्ञानाने महान होऊ शकतात.