आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्यात वेळेचा योग्य उपयोग करावा आणि लोभापासून दूर राहावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एक राजा आपल्या सेवकाच्या सेवेवर खूप प्रसन्न होता. राजाने सेवकाला सांगितले की, तू अशीच माझी मनापासूनस सेवा करत राहिल्यास मी तुला एक हजार सुवर्ण मुद्रा देईल. हे ऐकून सेवकाला खूप आनंद झाला. त्याने घरी जाऊन ही सर्व गोष्ट पत्नीला सांगितली आणि तिनेही राजाच्या सेवेमध्ये काहीही कमी पडू देऊ नका अन्यथा आपले नुकसान होऊ शकते असे पतीला सांगितले.


> त्यानंतर सेवक दिवस-रात्र राजाची सेवा करत लागला. कधीही सुटी घेतली नाही, राजाही त्याच्यावर खुश होता. सेवकाला एक हजार सुवर्ण मुद्रांचा लोभ होता आणि यामुळे त्याने कधीही इतर कोणते काम करण्याचा विचार केला नाही. फक्त राजाची सेवा करत होता.


> हळू-हळू वेळ निघत गेला. राजाने सेवकाला सुवर्ण मुद्रा दिल्या नाहीत, परंतु त्याला आशा होती की एके दिवशी राजा आपले वचन अवश्य पूर्ण करेल. खूप वेळ निघून गेला आणि तो वृद्ध झाला. एके दिवशी त्याच्याकडून एक चूक झाली आणि राजाला खूप राग आला. राजाने सेवकाला नोकरीवरून काढून टाकले. सेवकाने खूप विनवणी केली परंतु राजाने कोणतीही गोष्ट मान्य केली नाही.


> आता सेवकाला खूप दुःख झाले कारण त्याने एक हजार सुवर्ण मुद्रांच्या लोभापोटी इतर कोणतेही काम शिकून घेतले नव्हते. तारुण्य अवस्था अशीच निघून गेली आणि आणि वृद्ध अवस्थेमध्ये आता इतर कोणतेही काम करणे शक्य नव्हते.


> कथेची शिकवण हीच आहे की, लोभाच्या आहारी जाऊन वेळ व्यर्थ वाया घालवू नये. नेहमी काहीतरी नवीन शिकण्यासाठी तयार राहावे. सेवकाने वेळ असतानाच काहीतरी नवीन शिकले असते तर जास्त धन कमावू शकला असता परंतु तो एक हजार सुवर्ण मुद्रांच्या लोभामध्ये अडकून पडला.

बातम्या आणखी आहेत...