आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्या कामाविषयी संपूर्ण माहिती जाणून घ्यावी, अन्यथा नुकसान अटळ आहे

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राचीन काळी एक राजा जंगलात शिकारासाठी गेला. रस्ता भटकल्यामुळे राजाचे सैनिक मागेच राहिले. राजाला तहान लागली. तेवढ्यात त्याला एक लाकूडतोड्या दिसला. राजाने त्याच्याकडून पाणी घेतले आणि पिले. त्यानंतर राजा त्याला म्हणाला- तू माझ्या महालात ये, मी तुला पुरस्कार देईल. - काही दिवसानंतर लाकूडतोड्या राजाला भेटण्यासाठी आला. त्याला पाहून राजाला खूप आनंद झाला आणि राजाने त्याला चंदनाच्या झाडांची एक मोठी बाग भेट दिली. लाकूडतोड्या चंदनाची बाग मिळाल्यामुळे खूप आनंदी झाला. आता आयुष्य आरामात व्यतीत होणार असे त्याला वाटले. परंतु लाकूडतोड्याला चंदनाचे महत्त्व माहिती नव्हते. - लाकूडतोड्या रोज चंदनाचे एक-एक झाड तोडून कोळसा तयार करू लागला आणि विकून पोट भरू लागला. काही दिवसांमध्येच चंदनाची सुंदर बाग एक ओसाड जमीन बनली आणि त्यावर कोळशाचा ढीग लागला होता. बागेत आता फार थोडी चंदनाची झाडे शिल्लक राहिली होती. ही झाडे लाकूडतोड्याला सावली देत होते. - एके दिवशी राजा त्या बागेत आला आणि तेथील परिस्थिती पाहून आश्चर्यचकित झाला. राजा लाकूडतोड्याला म्हणाला- मी तुला चंदनाची हिरवीगार बाग दिली होती आणि तू हे काय करून ठेवले. लाकूडतोड्याने राजाला संपूर्ण गोष्ट सांगितली. - लाकूडतोड्याचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर राजाने त्याला चंदनाचे एक छोटेसे लाकूड दिले आणि बाजारात विकून येण्यास सांगितले. लाकूडतोड्याला त्या लाकडाचे चांगले पैसे मिळाले. त्याने ही गोष्ट जाऊन राजाला सांगितली. राजा म्हणाला- या लाकडाचे मूल्य कोळशापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. - राजाचे शब्द ऐकून लाकूडतोड्याला आपल्या चुकीची जाणीव झाली परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता. लाउडतोड्या आपल्या नशिबाला दोष देऊ लागला. त्यानंतर लाकूडतोड्या आपल्या गावी निघून गेला.

कथेची शिकवण : लाकूडतोड्याचे झाडाची योग्य माहिती माहित नसल्यामुळे नुकसान झाले. हीच गोष्ट आपल्यालाही लागू होते. कोणतेही खास काम सुरु करण्यापूर्वी त्याच्याशी संबंधित सर्व माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. असे केले तरच यश प्राप्त होऊ शकते. एखाद्या गोष्टीची माहिती नसल्यास चांगली संधीही आपण गमावून बसतो.

बातम्या आणखी आहेत...