आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्राचीन लोककथेनुसार, एका गावामध्ये एक अनाथ गरीब मुलगा राहत होता. यामुळे त्याला योग्य पालन-पोषण आणि शिक्षण मिळाले नाही. गावातील लोकांची कामे करून तो आयुष्य काढत होता. एके दिवशी त्याने मोठ्या नगरात जाऊन काम करण्याचा विचार केला, त्यामुळे त्याला पैसेही जास्त मिळतील असे वाटले.
> मुलगा गावाजवळ असलेल्या एका मोठ्या नगरात गेला. मुलाने दिवसभरात काहीही खाल्ले नव्हते आणि यामुळे त्याची तब्येत बिघडत चालली होती. तो लोकांकडे खाण्यासाठी अन्न मागत होता परंतु कोणीही त्याच्याकडे लक्ष दिले नाही.
> एका व्यापाऱ्याची दृष्टी त्याच्यावर पडली आणि त्याने मुलाला बोलावून जेवण दिले. मुलाने व्यापाऱ्याकडे काम मागितले. तुम्हाला कोणीतही तक्रार येऊ देणार नाही असे वचन दिले.
> व्यापाऱ्याने त्याला कामावर ठेवले. तो लाकडांचा व्यापारी होता. व्यापारी मुलाला म्हणाला तुला जंगलात जाऊन झाडे तोडावी लागतील. मुलगा हे काम करण्यासाठी तयार झाला.
> व्यापाऱ्याने मुलाला झाडे तोडण्यासाठी कुऱ्हाड दिली. पहिल्या दिवशी मुलाने संपूर्ण उत्साहात 15 झाडे तोडली. मुलाचे काम पाहून व्यापारी खुश झाला. दुसऱ्या दिवशी मुलाने 10 झाडेच तोडली. यामुळे मुलगा निराश झाला, उद्या जास्त झाडे तोडू असा त्याने विचार केला. तिसऱ्या दिवशी दिवसभर मेहनत करूनही तो 5 झाडेच तोडू शकला.
> निराश मुलाने व्यापाऱ्याला विचारले- मी पहिल्या दिवसाप्रमाणे झाडे का तोडू शकत नाहीये?
> व्यापाऱ्याने विचारले, तू दररोज कुऱ्हाडीला धार लावतोस का? मुलाने उत्तर दिले, मी एक दिवसही कुऱ्हाडीला धार लावलेली नाही.
> व्यापारी म्हणाला, कुऱ्हाडीला धार नसल्यामुळे तू जास्त झाडे तोडू शकला नाहीस. दररोज सकाळी काम सुरु करण्यापूर्वी तू कुऱ्हाडीला धार लावणे आवश्यक आहे. धार लावलेल्या कुऱ्हाडीमुळे तू कमी मेहनतीमध्ये जास्त झाडे तोडू शकशील.
> त्यानंतर मुलगा दररोज कुऱ्हाडीला धार लावून झाडे तोडण्यास जाऊ लागला आणि त्याचे कामही चांगले होऊ लागले.
कथेची शिकवण
या छोट्याशा कथेची शिकवण अशी आहे की, कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी त्या कामाविषयी सर्व लहान-मोठ्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. कामाचे पूर्ण ज्ञान असेल तरच त्यामध्ये यश प्राप्त होते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.