पत्नीने ठरवल्यास पतीला कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढू शकते

एका दाम्पत्याचा मुलगा अल्पायु होता, त्याच्या लग्नाच्या दिवशीच यमदेवाने नागाचे रूप घेऊन त्याला दंश केला, मुलाच्या पत्नीने नागाला उचलले आणि कमंडलूमध्ये बंद केले, सर्व देवी-देवतांनी तिला सांगितले हे स्वतः यमदेव आहेत...त्यानंतर काय घडले?

दिव्य मराठी

Apr 06,2019 12:03:00 AM IST

प्राचीन काळातील लोककथेनुसार एका दाम्पत्याला अपत्य सुख नव्हते. त्या दोघांनीही अपत्य प्राप्तीसाठी देवीची तपश्चर्या केली. देवी प्रसन्न झाली आणि म्हणाली माझ्याकडे दोन पुत्र आहेत. एक पुत्र हजार वर्ष जगेल परंतु मूर्ख राहील, दुसरा पुत्र अल्पायु असेल परंतु अत्यंत बुद्धिमान राहील. तुम्हाला यापैकी कोणता मुलगा हवा आहे. दाम्पत्य म्हणाले देवी- आम्हाला दुसरा मुलगा द्यावा.


> काही दिवसांनी दाम्पत्याच्या घरी एका मुलाने जन्म घेतला. तो पाच वर्षांचा झाल्यानंतर पती-पत्नीला मुलगा अल्पायु असल्यामुळे त्याची चिंता वाटू लागली. कोणत्या दिवशी अनर्थ घडेल याची काहीच कल्पना त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांनी मुलाला शिक्षणासाठी गुरुकुलमध्ये पाठवले.


> मुलाने संपूर्ण शिक्षण घेतले आणि तो 16 वर्षांचा झाल्यानंतर त्याचे एका सुंदर आणि संस्कारी मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नाच्या दिवशीच यमदेव नागाचे रूप धारण करून मुलाला दंश करण्यासाठी पोहोचले.


> संधी मिळताच नागाने मुलाला दंश केला आणि त्याचा मृत्यू झाला. हे पाहून त्याच्या पत्नीने नागाला उचलले आणि कमंडलूमध्ये बंद केले. मुलगी देवीची भक्त आणि तपस्वी होती. ही गोष्ट सर्व देवी-देवतांना समजल्यानंतर त्यांनी देवीकडे यमदेवाला मुक्त करण्याची विनंती केली. यमदेवाशिवाय सृष्टीचे संचालन थांबले आहे.


> मुलीसमोर देवी प्रकट झाली आणि नागाला मुक्त करण्यास त्यांनी मुलीला सांगितले. मुलगी म्हणाली, यांनी माझ्या पतीचे प्राण परत दिले तरच मी यांना मुक्त करेल. सर्व देवता मुलीच्या सतीत्वासमोर हरले आणि त्यांनी तिला पतीला जीवनदान देण्याचे वचन दिले.


> मुलीने कमंडलूतून नागाला बाहेर काढले. नाग मुक्त होताच यमदेव तेथे प्रकट झाले आणि मुलाचे कौतुक करून पतीला पुन्हा जिवंत केले.


कथेची शिकवण
कथेची शिकवण अशी आहे की, स्त्री आपल्या पतीच्या सर्व अडचणी दूर करू शकते. शास्त्र मान्यतेनुसार पत्नीच्या शुभ कामामुळे पतीचे भाग्य उज्वल होते आणि बाधा नष्ट होतात. यामुळे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्य आणि सौभाग्यासाठी व्रत-उपवास करतात.

X