आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाहेरचे कामही आवश्यक आहे, परंतु मुलांसाठीसुद्धा वेळ काढणे आवश्यक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एक व्यक्ती दिवसभर काम करून थकून-भागून आपल्या घरी पोहोचला. घर पोहोचताच मुलगा सोबत खेळण्यासाठी हट्ट करू लागला. व्यक्ती खूप थकलेला असल्यामुळे त्याने नकार दिला. तेवढ्यात मुलाने विचारले बाबा तुम्ही एका तासात किती पैसे कमावता? हा प्रश्न ऐकून व्यक्तीला राग आला परंतु त्याने 100 रुपये असे उत्तर दिले. मुलगा म्हणाला बाबा तुम्ही मला 50 रुपये उसने देऊ शकता का?


> हे ऐकून वडील रागात म्हणाले मी दिवसभर काम करतो आणि तुला फक्त व्यर्थ खर्चासाठी पैसे पाहिजेत, जा येथून पैसे नाहीत माझ्याकडे.


> मुलगा रडत-रडत आपल्या खोलीमध्ये निघून गेला. काही वेळाने वडिलांचा राग शांत झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, मुलासोबत त्यांनी चांगले केले नाही. त्याने विचार केला की मुलाने पैसे का मागितले होते?


> वडील मुलाच्या रूममध्ये गेले आणि पाकिटातून 50 रु काढून मुलाला दिले.


> मुलगा खुश झाला आणि त्याने लगेच आपल्या पैशांचा गल्ला फोडला. हे पाहून वडील म्हणाले तुझ्याकडे एवढे पैसे होते तर मग मला कशामुळे पैसे मागितलेस?


> मुलाने स्वतःचे पैसे आणि वडिलांचे 50 रुपये एकत्र वरून त्यांना 100 रुपये दिले आणि म्हणाला बाबा मला तुमचा एक तास पाहिजे. मला तुमच्यासोबत खेळायचे आहे, जेवायचे आहे. कृपया उद्या तुम्ही एक तास लवकर घरी या. हे ऐकून वडिलांच्या डोळ्यात पाणी आले आणि त्याने मुलाला आपल्या कुशीत घेतले. 


# कथेची शिकवण 
या छोट्याशा कथेची शिकवण अशी आहे की, आपल्यासाठी बाहेरचे काम आवश्यक आहे परंतु आपण मुलांसाठीसुद्धा वेळ काढणे आवश्यक आहे. मुलांसाठी त्यांचे आई-वडीलच जगापेक्षा मोठे असतात. मुलांसोबत जेवढा वेळ व्यतीत कराल तेवढेच ते आनंदी राहतील.