Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | inspirational story for happy life and achieve goal

एका मंत्र्याच्या सल्ल्याने राजाला समजले, संपूर्ण जगाला बदलण्याऐवजी स्वतःला बदल चांगले

रिलिजन डेस्क | Update - Dec 09, 2018, 12:03 AM IST

एका राजाचे आपल्या मुलीवर जीवापाड प्रेम होते, राजकन्येने बाहेरचे जग पाहिलेले नव्हते, एके दिवशी तिने शहर पाहण्याची इच्छा व

 • inspirational story for happy life and achieve goal

  प्राचीन काळातील एक राजा आपल्या मुलीवर खूप प्रेम करत होता. राजमहालातच राजकन्येसाठी सर्व सुख-सुविधा उपलब्ध होत्या. राजकन्येने बाहेरचे जगही पाहिलेले नव्हते. मोठी झाल्यानंतर तिने वडिलांकडे शहर पाहण्याची इच्छा व्यक्त केली.


  > राजाने नकार दिला परंतु मुलीने हट्ट सोडला नाही. त्यानंतर राजाने विचार केला की, माझ्या मुलीचे पाय एवढे कोमल आहेत की, ती दगडाच्या रस्त्यांवरून चालू शकणार नाही. त्यावेळी पक्के रस्ते नव्हते आणि चप्पल-बूटही घातले जात नव्हते.


  > राजाने सर्व मंत्र्यांना लगेच बोलावले आणि आदेश दिला, शहरातील सर्व रस्त्यांवर चामड्याची चादर अंथरण्यात यावी. यामुळे राजकन्येला चालताना त्रास होणार नाही.


  > हे ऐकून एका मंत्र्याने राजाला सल्ला दिला की, महाराज संपूर्ण शहरात चमडा अंथरण्याऐवजी आपण राजकन्येच्याच पायामध्ये चामड्याच्या वाहना (चपला) घालू. यामुळे राजकन्येचे पायही सुरक्षित राहतील आणि कामही सोपे होईल. सल्ला सोपा आणि सरळ होता. यामुळे राजाही तयार झाला.


  कथेची शिकवण
  शिकवण अशी आहे की, संपूर्ण जगाला स्वतःप्रमाणे अनुकूल बनवण्याऐवजी आपणच स्वतःमध्ये काही बदल करावेत. यामुळे आपण विविध अडचणींपासून दूर राहू शकतो. इतरांना बदलणे आपल्या नियंत्रणात नसते परंतु आपण स्वतःमध्ये बदल करू शकतो.

Trending