आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Inspirational Story For Kids, Motivational Story About Children,life Management Tips

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संत एका घरी भिक्षा मागण्यासाठी गेले, घरातून एक लहान मुलगी आली आणि म्हणाली की, बाबा आम्ही गरीब आहोत, आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही, संत म्हणाले मुली नाही म्हणू नको, अंगणातील माती देऊन टाक, शिष्याने विचारले गुरुजी माती का घेतली?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिलिजन डेस्क. जर बालपणापासून मुलांना चांगल्या गोष्टी शिकवल्या तर ते मोठे होऊन चांगले व्यक्ती बनतील आणि चांगले कामं करतील. यामुळे घर-कुटूंब आणि समाजाचे कल्याण होऊ शकते. मुलांना चुकीच्या गोष्टींपासून दूर ठेवले पाहिजे, अन्यथा ते चुकीच्या कामांकडे आकर्षित होतात. एका प्रेरक प्रसंगावरुन जाणून घ्या चांगल्या गोष्टी कशा समजावून सांगाव्यात...


- प्राचिन काळात एक संत आपल्या शिष्यासोबत भिक्षा मागण्यासाठी एका घराबाहेर पोहोचले. त्यांनी भिक्षा देण्यासाठी आवाज दिला तर आतून एक लहान मुलगी बाहेर आली आणि म्हणाली की, बाबा आम्ही खुप गरीब आहोत, आमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही, तुम्ही पुढे जा. 
- यानंतर संत मुलीला म्हणाले की, मुली नाही म्हणू नको काहीच नाही तुझ्याकडे तर अंगणातील थोडीशी माती दे. 
- मुलीने लगेच अंगणातील मुठभर माती भिक्षा पात्रात टाकली. 
- संताने मुलीला आशीर्वाद दिला आणि पुढे गेले. 
- काही अंतरावर गेल्यानंतर शिष्याने संताना विचारले की, गुरुजी माती काय घेण्याची वस्तू आहे का? तुम्ही भिक्षा म्हणून माती का घेतली?
- संताने शिष्याला उत्तर दिले की, आज ती मुलगी लहान आहे. आज ती नकार द्यायचे शिकली तर मोठे होऊन कुणालाही दान करणार नाही. आज तिने दानात थोडीशी माती दिली आहे, यामुळे तिच्या मनात दान देण्याची भावना जागृत होईल. उद्या ती मोठी होऊन सामर्थ्यवान बनेल तेव्हा फळ-फूल आणि धन दान करेल. 

 

कथेची शिकवण 
या छोट्याशा कथेची शिकवण म्हणजे, मुलांना बालपणापासून चांगले काम शिकवायला हवेत. जर त्यांना बालपणापासून चांगल्या कामांसाठी प्रेरित केले तर ते मोठे होऊन चांगले व्यक्ती बनतील आणि वाईट गोष्टींपासून दूर राहतील. आपण जेव्हा दान करतो तेव्हा लहान मुलांकडून करुन घ्यायला पाहिजे, यामुळे ते दूस-यांना मदत करणे शिकतील.