आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लहानशा अडचणीसमोर गुडघे टेकणाऱ्यांनी या चिमुरड्याकडून शिकावा धडा, सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कंसास - जे लोक अगदी लहान लहान अडचणींना घाबरून परिस्थितीसमोर गुडघे टेकतात त्यांच्यासाठी ही स्टोरी आहे. अमेरिकेच्या कंसासमध्ये राहणारा अवघा दोन वर्षांचा रोमन डिनकेल अशा सर्व लोकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सध्या रोमन सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रोमन कुबड्यांच्या आधारे चालताना दिसतोय. 


रोमनला आहे मणक्याचा आजार 
रोमनला स्पाइना बिफिडा नावाचा आजार आहे. त्यामुळे त्याचा मणका कमकुवत झाला आहे. त्याची आई व्हिटनी डिनकेल यांच्या मते, 'अल्ट्रासाऊंड दरम्यान आम्ही सर्वकाही सुरळीत होईल अशी आशा केली होती. पण आम्हाला जेव्हा याबाबत कळले तेव्हा आम्हाला धक्का बसला. पण तरीही रोमनच्या आई वडिलांनी या सर्व अडचणींचा सामना करण्याचा निर्णय घेतला. 

 
पडत-पडत चालायला शिकला 
रोमनची आई म्हणाली की, मी सुरुवातीला रोमनला चालताना खाली पडू दिले. कारण प्रत्येकवेळी सांभाळायला मी नसेल हे त्याला लक्षात यावे असे त्या म्हणाल्या. यानंतर तो प्रयत्नपूर्वक स्वतःच्या पायावर चालायला शिकला. आता रोमन चालताना खूप आनंदी असतो. जेव्हा रोमन पहिल्यांदा स्वतःच्या पायावर उभा राहिला तेव्हा तो अत्यंत उत्साही होता त्यामुळे त्याच्या आई वडिलांनी हा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला. तो पाहता पाहता एवढा व्हायरल झाला की आता अनेकांना या व्हिडिओतून प्रेरणा मिळतेय. 

 

 

बातम्या आणखी आहेत...