लांडगा, कावळा आणि बिबट्या वाघासोबत राहायचे, तिघांनाही आयती शिकार मिळायची, एकेदिवशी वाटचुकून जंगलात एक उंट आला, जंगलात ऊंटाला आश्रय मिळाला, तिघांनीही केला धुर्तपणा...


कधीही धुर्त लोकांच्या जाळ्यात अडकू नका, नाहीतर आपल्या जीवावर संकट येऊ शकते.

दिव्य मराठी

Apr 17,2019 03:52:00 PM IST

रिलीजन डेस्क- एका जंगलामध्ये सिंहासोबत लांडगा, कावळा आणि बिबट्या राहत होते, या तिघांना काही कष्ट न घेता वाघाच्या शिकारमधले उरलेले जेवन मिळायचं. एक दिवस जंगलात ऊंट आला, त्याला जंगलात पाहून सगळ्या प्राण्यांना आश्चर्य वाटले कारण ऊंट तर वाळवंटात राहतात.


प्राण्यांनी ऊंटाला विचारल्यावर कळाले की, ऊंट वाट चुकून जंगलात आला आहे. ही गोष्ट जेव्हा वाघाला कळाली तेव्हा वाघाने ऊंटाला जंगलात राहण्याची परवानगी दिली. लांडगा, कावळा आणि बिबट्या यांना वाटत होते की वाघाने ऊंटाची शिकार करावी म्हणजे त्यांना ऊंटाचे मांस खायला मिळेल, पण वाघाने नकार दिला. काही दिवसांनी वाघ आजारी पडला आणि त्याला शिकार करणे जमत नव्हते. वाघाच्या तिन्ही मित्रांनी ऊंटाची शिकार करण्याची परवानगी मागीतली, त्यावर वाघ म्हणाला मी ऊंटाला आश्रय दिला आहे, मी त्याचा बळी नाही घेऊ शकत. लांडगा, कावळा आणि बिबट्या तिघेही खूप चालाख होते. त्यांनी एक युक्ती केली आणि वाघासमोर स्वताला जेवन म्हणून सादर करू लागले. वाघाने तिघांचीही शिकार करणे अमान्य केले. हे बघुन ऊंटानेही स्वतला जेवन म्हणून सादर केले आणि तिन्ही चालाख प्राण्यांनी लगेच ऊंटावर हल्ला करून त्याला मारून टाकले.

कथेची शिकवन
चालाख आणि वाईट लोकांवर विश्वास ठेवणे म्हणजे मुर्खपणा आहे. असे लोक श्रीमंत माणसांसोबत केवळ आपल्या फायद्यासाठी राहतात.

X