आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाएट साॅफ्ट ड्रिंक्सने बिघडली प्रकृती, फ्लेव्हर्ड पाणी विकून उभारली ७०० काेटींची कंपनी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूयाॅर्क - अनेकदा जीवनात अडचणींतूनच नवे मार्ग निघतात. फक्त आपण पराभव न मानता उत्तर शोधले पाहिजे. अमेरिकेतल्या सिलिकॉन व्हॅलीमध्ये माेठा पगार असलेली महत्त्वाकांक्षी कारा गाेल्डीनचे वजन सारखे वाढत हाेते. सुस्ती आणि थकवा जास्त आणि ताे लवकर लवकर येत हाेता.

एका डाॅक्टर मित्राने काराला सांगितले, जर तुम्ही आपल्या पिण्याचा आहार व्यवस्थित केला तर आराेग्याशी निगडित अनेक गाेष्टी आपाेआप सुरळीत हाेऊ लागतात. काराने नंतर बघितले तर ती डाएट काेलाचे दरराेज १० कॅन पिते. नकळत त्याची सवय तिला लागली हाेती. तेव्हा काराला जाणवले की, ती राेज ३ ते ४ लिटर कॅफेनयुक्त, कृत्रिमरीत्या गाेड केलेले लिक्विड पीत आहे. त्यामुळे तिला जास्त सुस्त व थकल्यासारखे वाटते. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत कारा म्हणाली, त्यानंतर तिने एआेएल टेक ग्रुपची उच्च पदाची नाेकरी साेडली. पूर्ण जीवनशैली सुधारताना तिने उत्पादित साॅफ्टड्रिंक्स पिणे साेडून दिले. ती केवळ पाणी पिऊ लागली. महिन्यात तिचे वजन ९ किलाेने कमी झाले. मुरूम नष्ट झाले. तिला स्वत:मध्ये ऊर्जा आल्याचे वाटू लागले. कारा म्हणते, साधे पाणी पिऊन कंटाळा आला हाेता. त्यानंतर ती पाण्यात काही फळांचे तुकडे कापून टाकायची. त्यामुळे पाणी जास्त स्वादिष्ट झाले. यातून काराला व्यवसायाची कल्पना सुचली. 
 

साॅफ्ट ड्रिंक्स वा डाएट काेलाचा परिणाम नेहमी वादग्रस्त राहिला
अनेक तज्ञ आणि आराेग्य अहवालानुसार ड्रिंक्स आराेग्यासाठी नुकसानदायक आहे. दातापासून ते हाडांपर्यंत त्याने नुकसान हाेते. सप्टेंबर २०१९ मध्ये आय वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनच्या अहवालानुसार मुदतपूर्व मृत्यूसाठीदेखील हे ड्रिंक्स कारणीभूत आहेत. यामधील फाॅस्फाेरिक अॅसिड हाडांना कमजाेर बनवते. यातील कृत्रिम साखर आणि प्रिझर्व्हेटिव्हही नुकसानदायक आहे. परंतु कंपन्या ते नाकारतात.