Home | Jeevan Mantra | Disha Jeevanachi | inspirational story of king and mantri about help

मंत्र्याने अशाप्रकारे राजाला समजावून सांगितले सेवेचे महत्त्व

रिलिजन डेस्क | Update - Dec 08, 2018, 12:02 AM IST

राजाच्या मंत्र्याकडून एक चूक झाली आणि त्याला मृत्युदंड सुनावण्यात आला, 10 जंगली श्वानांसमोर टाकण्याचे आदेश दिले, परंतु म

 • inspirational story of king and mantri about help


  प्राचीन काळी एका राजाने गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी 10 जंगली कुत्रे पाळले होते. गुन्हेगाराला मृत्यूची शिक्षा सुनावल्यानंतर या कुत्र्यांसमोर त्या व्यक्तीला टाकले जायचे. सर्व श्वान मिळून त्या गुन्हेगाराला मारून टाकायचे.


  > एके देवीशी राजाच्या मंत्र्यांकडूनच एक छोटीशी चूक झाली आणि क्रोधीत झालेल्या राजाने त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली. राजाने मंत्र्याला कुत्र्यांसमोर टाकण्याचे आदेश दिले. मंत्र्याने शेवटच्या इच्छा स्वरूपात 10 दिवसांचा वेळ मागितला. तो राजाला म्हणाला- महाराज, मी तुमची दहा वर्षांपर्यंत सेवा केली असल्यामुळे कृपया माझी एवढी इच्छा पूर्ण करा. राजा मंत्र्याची इच्छा पूर्ण करतो आणि त्याला 10 दिवस देतो.


  > 10 दिवसानंतर राजाने मंत्र्याला त्या श्वानांसमोर टाकण्याचे आदेश दिले. सैनिकांनी मंत्र्याला श्वानांसमोर टाकले परंतु त्या श्वानांनी मंत्र्याला मारले नाही तर त्याच्यासमोर शेपूट हलवून त्याच्यासोबत खेळू लागले.


  > राजा हे पाहून चकित झाला आणि मंत्र्यालाच विचाराचे की, हे सेव्हन तुझ्यासोबत कसे काय खेळत आहेत?


  > मंत्र्याने राजाला सांगितले की- मी तुमच्याकडे जे 10 दिवस मागितले होते, त्या काळात या प्राण्यांची मी खूप सेवा केली, यांना खाऊ-पिऊ घातले आणि यांची संपूर्ण काळजी घेतली. 10 दिवसांची सेवा हे श्वान विसरले नाहीत आणि मी समोर येताच माझ्यासोबत खेळू लागले.


  > पुढे मंत्री राजाला म्हणाला की, 'मला माफ करा पण तुम्ही मानव असूनही माझी 10 वर्षांची सेवा विसरून गेलात आणि माझ्या एका क्षुल्लक चुकीसाठी मला मृत्युदंडाची शिक्षा सुनावली.' या गोष्टी ऐकून राजाला त्याची चूक समजली आणि मंत्र्याला माफ केले.


  कथेची शिकवण
  राजाप्रमाणे आपणही कधीकधी क्रोधीत होऊन अशा लोकांचे वाईट करतो ज्यांनी कधीकाळी आपली मदत आणि सेवा केलेली असते. व्यक्तीने क्षमाशील असावे. इतरांच्या चुका विसरून पुढे चालत राहावे.

Trending