मंदिरातील पंडितजींच्या मृत्यूनंतर झाली नव्या पुजाऱ्याची नियुक्ती, एक दिवस पंडितजी बसने जात होते शहरात, कंडक्टरने दिले जास्त पैसे, पंडितजीने केले असे काही

पंडितजी कंडक्टरला म्हणाले तुम्ही चुकिने मला दहा रुपये जास्त दिले होते

दिव्य मराठी वेब टीम

Apr 13,2019 06:55:00 PM IST

रिलीजन डेस्क- एका पौराणिक कथेनुसार एका गावामधील एका मंदिरातील पुजाऱ्याचा मृत्यू झाला. त्यानंतर गावकऱ्यांनी मंदिरात दुसऱ्या पुजाऱ्याची नियुक्ती केली. नवे पुजारी गावकऱ्यांना रोज प्रवचन द्यायचे. लवकरच पंडितजींची ख्याती प्रचंड वाढली. एक दिवस पंडितजी बसमधुन शहरात जात होते. त्यांनी कंडक्टरला किरायाचे पैसे दिले. कंडक्टरने किराया घेऊन त्यांना बाकीचे पैसे परत दिले. पडितजींनी पाहिले की त्यांच्याजवळ दहा रुपये जास्त आले आहेत, त्यांनी विचार केला की थोड्या वेळाने कंडक्टरला पैसे परत करू. काही वेळाने पंडितजीनी विचार केला की दहा रूपयासाठी विना कारण त्रास करुन घेण्याची गरज नाही. अन तसेही बस वाले तर रोज लाखों रुपये कमवतात. दहा रुपयांनी त्यांना काय फरक पडणार. हे पैसे मी माझ्याजवळच ठेवतो, तसेही कंडक्टरला हे माहित नाही. या सगळ्या विचारात गुंतले होते, तेवढ्यात शहर आले. बसमधुन उतरताच त्यांची पाऊले अचानक थांबली, त्यांनी दहा रूपये काढले आणि कंडक्टरच्या हातात दिले. पंडितजी कंडक्टरला म्हणाले तुम्ही चुकिने मला दहा रुपये जास्त दिले होते.


त्यावर कंडक्टरने विचारले तुम्हीच मंदिराचे नवे पुजारी का, पंडितजीने होकार्थी मान हलवली. कंडक्टर म्हणाला- मी तुमच्या प्रवचनाबद्दल खूप ऐकले आहे, जेव्हा तुम्हाला बस पाहिले तेव्हा मी तुम्हाला मुद्दामुन पैसे परत दिले. मला पहायचे होते की जास्त पैसे मिळाल्यावर तुम्ही काय करता. मला आता समजले की तुमच्या प्रवचनासारखेच तुमचे आचरण सुध्दा आहे. यातुन सर्वांनी शिकवन घेतली पाहिजे. कंडक्टरने दहा रूपये घेतले आणि बस पुढच्या प्रवासाला निघाली. कंडक्टरचे बोलने ऐकुन पंडितजी घामाघुम झाले. त्यांनी दोन्ही हात जोडुन देवाला नमस्कार केला. योग्य वेळी माझ्या लोभाचा नाश करुन माझी बुध्दी जागरत केली. नाही तर आज दहा रुपयांसाठी माझा मान सन्मान गेला असता. देवाने मला या अडचणीतून वाचवले.

कथेची शिकवन:
देव आपल्या भक्तांना अडचनीतून वाचवतो आणि योग्य अयोग्य समजण्याची बुध्दी प्रदान करतो.

X
COMMENT