आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 वीत असताना नापास झाल्या होत्या या कलेक्टर, नंतर मेहनतीने बनल्या IPS टॉपर...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- रुक्मणि रियार यांनी काही दिवसांपूर्वीच बूंदी जिल्ह्यातील कलेक्टर पदाचा भार स्वीकारला आहे. पद स्वीकारताच त्या म्हणल्या की, माझी प्राथमिकता राहील की, सामान्य लोकांच्या समस्यांचे समाधान करायचे. त्यासोबतच लोकांमध्ये विश्वास वाढवणे की, सगळी प्रकरणे निष्पातीपणाने सोडवली जातील.


चंदिगढमध्ये वाढलेल्या रूक्मिणि यांनी 2011 च्या UPSC परिक्षेत देशभरातून दुसरे स्थान मिळवले होते. टाटा इंस्टीट्यूट ऑफ सायंसेजमधून मास्टर केल्यानंतर त्यांनी पहिल्या प्रयत्नातच हे यश संपादन केले. खास बाब म्हणजे त्यांनी यासाठी कोणत्याच कोचिंग क्लासेसमधून अभ्यास न करता स्वत:च्या हिमतीवर हे यश मिळवले आहे.

 

रूक्मिणि यांचा जन्म होशियारपूरमध्ये झाला. त्यांचे वडील हे सेवानिवृत्त डिप्टी डिस्ट्रिक्ट अटॉर्नी बलजिंदर सिंग आहेत. त्यांना लहानपणीच बोर्डींग स्कुल पाठवण्यात आले. त्यानंतर त्या 6 वीत असताना नापास झाल्या. या गोष्टीमुळे त्या खुप डिप्रेशनमध्ये गेल्या होत्या.

 

त्यांनी सांगितले की, नापास झाल्यामुळे कुटुंबीय आणि शिक्षकांसमोर जाण्यास भिती वाटायची.  अनेक दिवस डिप्रेशनमध्ये राहिल्यावर त्यांनी विचार केला की, आता यामधून बाहेर आले पाहिजे. त्या दिवशी त्यांनी ठरवले की, आयुष्यात काहीतरी मोठे करून दाखवायचे.

 

त्यानंतर त्यांनी मनात निष्चय केला आणि कठोर परिश्रमानंतर त्यांनी टाटा इंस्टीट्यूट ऑफ सायंसेजमधून मास्टर केले आणि UPSC ची परिक्षा दिली आणि पहिल्याच प्रयत्नात त्यांनी देशात दुसरे स्थान मिळवले.

बातम्या आणखी आहेत...