आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुखी जीवनाचे रहस्य : ज्या घरात प्रेम असते तिथे यशासोबत धनसंपत्तीचेही आगमन होते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जीवनमंत्र डेस्क - पौराणिक काळातील ही गोष्ट. एका गावात तीन साधू राहत होते. ते तिघेही गावात भटकंती करून भिक्षा मागत असत आणि मिळालेल्या भिक्षेतून आपला उदरनिर्वाह करत होते. एक दिवस गावातील एका महिलेने तिन्ही साधूंना आपल्या घराबाहेर पाहिले. महिलेने त्यांना आपल्या घरी जेवण करण्याचा आग्रह केला. पण घरात प्रवेश करण्यापूर्वी एका साधूने तिला विचारले की, आपले पती आता घरात आहेत का? पण महिलेने घरात एकटीच असल्याचे सांगितले. त्यामुळे साधूंनी सांगितले की, जेव्हा आपले पती आणि मुलं घरी येतील तेव्हा आम्हाला आमंत्रित करा असे सांगून तिघेही साधू तिथून निघून गेले. 


सायंकाळी पती आणि मुलगी घरी आले तेव्हा महिलेने घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यामुळे तिच्या पतीने साधूंना जेवू घालण्यासाठी होकार दिला. दुसऱ्या दिवशी महिला तिन्ही साधूंना आमंत्रण देण्यासाठी आश्रमात गेली. पण ते तिघे एकत्र जेवण करण्यासाठी कोणाच्या घरी जाऊ शकत नसल्याचे साधूंनी महिलेला सांगितले. 


महिलेने त्यांना याचे कारण विचारले तर, त्यांनी सांगितले की, आमचे नाव धन, यश आणि प्रेम आहे. त्यामुळे साधूंनी महिलेला सांगितले की, आपल्या पतीला विचारून सांगा की, आपण आमच्यापैकी कोणाला आपल्या घरी बोलावण्याची इच्छा आहे. महिलेने घरी येऊन आपल्या पतीला घडलेला प्रकार सांगितला. यावर महिलेचा पती म्हणाला की, आपण धनाला आपल्या घरी बोलवूया. यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल. पण लगेच त्यांची मुलगी म्हणाली की, आपण प्रेमाला आपल्या घरी बोलवू, कारण प्रेमापेक्षा या जगात काहीच श्रेष्ठ नाही. पती-पत्नीला मुलीचे म्हणणे ऐकले आणि महिलेने आश्रमात जाऊन प्रेम नावाच्या साधूला जेवणासाठी आमंत्रित केले.


प्रेम नावाचे साधू त्या महिलेसोबत निघाले असता, इतर दोघे साधूही त्यांच्यासोबत येऊ लागले. त्यामुळे त्या महिलेने विचारले की, आपण तर म्हणाला होता की, आपल्यापैकी एकच जण आमच्या घरी जेवायला येईल पम आता आपण तिघेही का येत आहात ?

यावर साधूने महिलेला सांगितले की, आपण जर धन किंवा यशाला बोलावले असते तर, दोघांपैकी फक्त एकच आपल्या घरी आला असता, पण आपण प्रेमाला बोलावले आणि जिथे प्रेम असते तिथे धन आणि यश आपोआप येत असते.

 

कथेची शिकवण
आपण आयुष्यात सर्वात अधिक महत्व प्रेमाला दिले पाहिजे. ज्या घरात प्रेम असते, तिथे सुख, शांति आणि संपन्नता सदैव राहते. घरात प्रेम असल्यामुळे व्यक्ती चांगले काम करून धन प्राप्त करू शकतो.