Home | Jeevan Mantra | Dharm | Inspirational story, prerak prasang, story of a king and sant

प्रेरक प्रसंग: एका राज्याचा राजा खूप क्रूर होता, तो विनाकारण आपल्या राज्यातील प्रजेला छळायचा; एकदा एका ऋषींनी राजाला काही प्रश्न विचारले, त्यानंतर राजाच्या वागणूकीत झाले अनेक बदल

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 14, 2019, 12:33 AM IST

व्यक्तीला आपल्या अधिकारांचा उपयोग लोकांच्या हितासाठी करायला हवा.

 • Inspirational story, prerak prasang, story of a king and sant

  प्रेरनादायक गोष्ट : एक राज्य होते. त्या राज्याचा राजा खूप क्रूर होता. त्याला दुसऱ्यांना त्रास देण्यात खूप मज्जा वाटायची. त्यामुळे तो वाटेल तेव्हा आपल्या राज्यातील कोणालाही फाशीवर चढवायचा, लोकांना मारायचा. राजाची ही क्रूर वागणूक पाहून त्याच्या राज्यातील प्रजा खूप दु:खी होती. अनेकांनी राज्य सोडून दुसरीकडे पलायन केले. परंतू यावर उपाय म्हणुन त्याच राज्यातील काही लोक जंगलातील ऋषींकडे गेले. त्यांनी ऋषींसमोर आपली सगळी व्यथा मांडली.

  > या सर्व लोकांची व्यथा ऐकल्यानंतर ऋषींनी त्यांना सांगितले की, ठिक आहे मी राजाशी बोलतो.
  > दुसऱ्या दिवशी ऋषी राजाच्या दरबारात पोहचले. ऋषीला आपल्या दरबारात पाहून राजाही त्याचे स्वागत केले. आणि त्यांना विचारले की, महाराज मी आपली काय सेवा करु.
  > त्यावर ऋषींनी सांगितले की, महाराज तुम्ही या राज्याचे राजा आहात मी तुम्हाला एक प्रश्न विचारु का? कृपया माझ्या प्रश्नाचे उत्तरे द्या.
  > त्यावर राजाने सहमती दर्शवत ऋषींना प्रश्न विचारण्याची परवानगी दिली.
  > ऋषी म्हणाले, महाराज गृहित धरा की तुम्ही शिकारीसाठी जंगलात गेले आहात आणि तिथे तुम्ही परत येण्याचा रस्ता विसरला. बरेच प्रयत्न करुनही तुम्ही जंगालाच्या बाहेर येऊ शकत नाही. त्यातच तुम्ही तहानलेले आहात आणि पाणी न मिळाल्याने तुम्ही शेवटचे क्षण मोजत आहात. अशा परिस्थितीत तिथे तुमच्या मदतीसाठी कोणीतरी धावून आले आणि तुम्हाला अशुद्ध पाणी पाजण्याच्या बदल्यात तुमच्याकडून अर्धे राज्य मागितले तर त्यावेळी तुम्ही काय कराल?
  > ऋषींच्या या प्रश्नावर राजा उत्तरला की, माझा जीव वाचवण्यासाठी मला अर्धे राज्य द्यावेच लागेल.
  > त्यावर ऋषी म्हणाले, जर तुम्ही ते अशुद्ध पाणी पिऊन आजारी झालात आणि तेव्हा जीव वाचवण्यासाठी वैद्याने तुमच्याकडून उर्वरीत राज्यही मागून घेतले तर तुम्ही काय कराल?
  > राजाने म्हणाला, जर जीवच नाही राहिला तर राज्य काय कामाचे, मी जीव वाचवण्यासाठी वैद्याला अर्धे राज्यदेखील देऊन टाकेन.
  > यानंतर ऋषी राजाला म्हणाले की, राजन तुम्ही तुमचा जीव वाचवण्यासाठी जर पूर्ण राज्याचा त्याग करत असाल तर तुमच्या राज्यातील जनतेचे प्राण का घेतात? तुमच्या राज्यातील प्रजेचे रक्षण करणे हे तुमचे आद्य कर्तव्य आहे. तुमच्यासारखेच तुमच्या प्रजेतील लोकांचेही प्राण तेवढेच महत्वाचे आहे. सर्वांना घरदार आहे. तुम्ही विनाकारण प्रजेला फाशीवर लटकवता त्यामुळे त्या व्यक्तीचे अख्खे कुटुंब बर्बाद होते. तुम्ही तुमच्या अधिकारांचा गैरवापर करुन प्रजेला विनाकारण त्रास देतात. तुम्ही असे का करत आहात?
  > हे ऐकल्यानंतर राजाला आपली चुक लक्षात आली आणि पश्चाताप करत राजाने ऋषींना वचन दिले. राजाने जनतेसमोर इथून पुढे प्रजेच्या हिताचीच कामे करेल अशी शपथ घेतली.
  > या गोष्टीचा सार असा की, व्यक्तीने आपल्या अधिकारांचा वापर लोकांच्या हितासाठी करायला हवा. कोणालाही विनाकारण त्रास देणे चुकीचे आहे. दुसऱ्यांना चांगली वागणूक देणे हाच मानवतेचा खरा धर्म आहे.

Trending