आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Triple Murder: रोज क्राइम पॅट्रोल पाहायचा मुलगा; पहाटे 3 वाजता केली आई-वडिलांसह बहिणीची हत्या, धक्कादायक होते कारण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - दिल्लीतील एका कुटुंबात झालेल्या ट्रिपल मर्डर प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला आहे. आई-वडील आणि त्यांच्या मुलीचा खून झाला. स्थानिक आणि पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांचा मुलगा जखमी अवस्थेत सापडला. तोच मुलगा या तिघांचा मारेकरी निघाला आहे. सर्वांचा खून करून त्याने स्वतःला जखमी केले आणि मुद्दाम शेजाऱ्यांना ओरडून बोलावले. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा आपण झोपेत होतो असे ढोंग त्या मुलाने केले. परंतु, खूनी कितीही हुशार असला तरी एका चुकीने पकडल्या जातो. तसाच या मोरकऱ्याचा ढोंग सुद्धा काही तासांतच उघडकीस आला. पोलिसांना त्याच्या या कृत्याचे कारण विचारले तेव्हा उत्तर ऐकूण सर्वांनाच धक्का बसला.


या चुकांवर गेले पोलिसांचे लक्ष...
> जखमी मुलाने पोलिसांना सुरुवातीला सांगितले होते, की एक हल्लेखोर बिल्डिंगमध्ये घुसला आणि त्याने तिघांना ठार मारले. घटनेच्या वेळी तो झोपेत होते. आवाज ऐकूण उठला तेव्हा हल्लेखोराने त्याचे डोके भिंतीला आदळले आणि पळून गेला. 
> पोलिसांनी तपास केला तेव्हा बिल्डिंगचे मेन गेट आतून लॉक होते. सोबतच पहिल्या मजल्याचे दार सुद्धा बंदच होते. अशात कुणी येऊन निघून जाण्याची शक्यता फारच कमी होती. 
> आई सिया हिच्या शरीरावर ज्वेलरी जशास तशी होती. लुटीसाठी कुणी आले आणि दागिन्यांना हातही लावला नाही हे पोलिसांना खटकले. एवढेच नव्हे, तर घरातील मोबाईल आणि मोल्यवान वस्तू सुद्धा तेथेच होत्या. 
> घराला मागूनही एक गेट आहे. परंतु, संध्याकाळपासून तेही बंद होते. अशात मारेकऱ्याने तिघांचा खून केला आणि मुलालाच जिवंत कसे सोडले असा प्रश्न पोलिसांना पडला. 
> यानंतर मुलाने सांगितले होते, की चोरटे गॅलरीच्या भिंतीवरून आले आणि निघून गेले. पोलिसांनी गॅलरीच्या शेजारची भिंत पाहिली त्यावर प्रचंड धूळ होती. परंतु, चप्पल, बूट किंवा पायांच्या खुना त्यांना दिसून आल्या नाही. त्यामुळे पोलिसांना शंका आली ती फक्त आणि फक्त त्या मुलावर...


अख्खे कुटुंब संपवून डोळ्यांत नव्हता अश्रूचा एक थेंब!
> पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा मुलगा (सूरज) आपल्या आई (सिया) वडील (मिथिलेश) आणि बहिणीच्या (नेहा) मृतदेहाजवळ बसला होता. परंतु, त्याच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब नव्हता. सोबतच चेहऱ्यावर दुखाचे भावही दिसत नव्हते. पोलिसांना शंका आली. तेव्हा त्यांनी रागात विचारले आणि आरोपी मुलगा खोटे बोलू शकला नाही. 
> चौकशीत त्याने सांगितले, की त्याच्या वडिलांचा त्याला प्रचंड द्वेष होता. तर बहिणीने बॉयफ्रेंड बनवल्याने तो तिच्यावर नाराज होता. आरोपी मुलगा व्यसनी होता असेही पोलिसांच्या निदर्शनात आले आहे. वाइट सवयींमुळे तो नेहमीच आई-वडिलांचा मार खायचा. तो बारावीत एकदा नापासही झाला होता. 
> रोज-रोज मार खाऊन वैतागल्यानंतर त्याने क्राइम पॅट्रोल हा सीरियल पाहत तिघांच्या हत्येचा कट रचला होता. सुरुवातीला त्याने घरात धारदार चाकू आणि कात्री आणून लपविले. यानंतर भल्या पहाटे 3 वाजता झोपेतून उठून बहिणीच्या खोलीत शिरला. तिचे तोंड दाबून गळ्यावर आणि छातीवर सपा-सप वार केले. यानंतर आई आणि वडिलांचा देखील खून केला. चाकूचे इतके वार झाल्यानंतरही बहिण रक्ताने माखलेल्या अवस्थेत मदतीची भीक मागत होती. तरीही भावाला तिच्यावर दया आली नाही.


15 ऑगस्टला वडिलांनी पंतगवरून धुतले होते...
पोलिसांना सूरजने सांगितल्याप्रमाणे, 15 ऑगस्ट रोजी त्याच्या वडिलांनी पंतगवरून सूरजला खूप मारले होते. त्याचवेळी आपल्या बापाचा खून करणार असे सूरजने ठरवले होते. तेव्हापासूनच रोज क्राइम पॅट्रोल सीरियल पाहून तो हत्येचा कट रचत होता. सर्वांचा खून करण्याच्या अवघ्या काही तासांपूर्वी अर्थात संध्याकाळी सूरजने आपल्या कुटुंबियांसोबत वेळ घालवला. त्यांना घरातील जुने फोटो अलबम दाखवून आठवणी ताज्या केल्या. परंतु, त्यावेळी सूरजच्या मनात काही औरच सुरू होते. 


5 वर्षांपूर्वी रचले होते स्वतःच्या अपहरणाचे सोंग
मिथलेशचे मोठे बंधू चंद्रभान छतरपूरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी चौकशीत सांगितल्याप्रमाणे, 2013 मध्ये  सूरज पुस्तक खरेदीच्या बहाण्याने 500 रुपये घेऊन निघाला होता. परंतु, घरी परतलाच नाही. वडिलांनी त्याच्या बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांत दाखल केली होती. काही तासांनंतर सूरजने वडील मिथिलेश यांना फोन लावला. आपण एका रेल्वे स्टेशन जवळ आहोत. कुणीतरी तोंडात कपडा कोंबून अपहरण केले होते असे त्याने सांगितले होते. यानंतर सूरजने दिलेली माहिती खोटी निघाली होती. 


आई-बहिणीच्या छातीवर केले असंख्य वार
नेहाची एक मैत्रिण तिच्या शेजारीच राहत होती. तिने सांगितल्याप्रमाणे, शेजारच्या घरात नेहाचा मृतदेह रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमीनीवर पडला होता. त्याच खोलीत आई सियाचा देह होता. मिथिलेशच्या पायावर एक आणि गळ्यावर तसेच छातीवर चाकूचे प्रत्येकी तीन-तीन वार होते. तर आई सिया आणि बहिणी नेहाच्या छातीवर त्याने चाकूचे असंख्य वार केले होते. मिथिलेश यांचा एक भाऊ छतरपूर तर दुसरे दोन भाऊ सुभाष आणि रामलखन गावात राहतात. हत्येची माहिती मिळताच सगळेच नातेवाइक घटनास्थळी पोहोचले. आरोपी मुलाचे एकूणच 10 जिवलग परंतु टुकार मित्र मंडळी होते. पोलिसांनी त्यांचीही चौकशी करणार असे संकेत दिले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...