आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रेस अपघाताने 100 फूट खाेल घाटात पडूनही कायम ठेवली सायकलिंग; विक्रमासाठी स्वत: तयार केली बांबूची सायकल!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- चाळीसगाव घाटाचा राजा स्पर्धेत सलग १२ वेळा चॅम्पियन आणि इतर स्पर्धांमधील जेतेपदामुळे सायकलींगच्या क्षेत्रात चरणजित सिंग संघा तीन दशके अधिराज्य गाजवले. मात्र, याच वर्चस्वाला अचानक रेसदरम्यान झालेल्या अपघाताने ब्रेक लागला. हा ब्रेक त्याला काही केल्या स्वस्थ बसू देत नव्हता. अखेर दान वर्षांच्या विश्रांतीनंतर ताे पुन्हा नव्या उमेदीने परतला ताे बीआरएमच्या विक्रमासाठीच. यासाठी त्याने स्वत:च्या हाताने तयार केलेल्या सायकलवरूनच हा पराक्रम गाजवण्याचे ठरवले. यासाठी त्याने स्वत: घरीच बांबुपासून सायकल तयार केली. आता औरंगाबादचा हा जिगरबाज सायकलीस्ट बांबुच्या सायकलवरून बीआरएमची २०० किमीचे अंतर अवघ्या ९ तासात गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. येत्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ताे हा पल्ला गाठणार आहे. यासाठीचे अधिकृत असे पत्रही त्याला मिळेल. 

बीआरएममधील सलग ११ तास २०० किमी सायकलिंगचाची पात्रता पुर्ण करण्यासाठी औरंगाबादचा सायकलपटू चरणजित सिंग संघा हा सायकलपटू चांगलाच झपाटला. त्याने यासाठी चक्क स्वत:च्या हाताने घरीच बांबूपासून सायकल तयार केेली. याच सायकलवरून ताे हा विक्रमाचा पल्ला अवघ्या ९ तासांत गाठण्यासाठी सज्ज झाला. त्याने चार हजारात घरीच बांबूपासून ही सायकल तयार केली. विदेशात याची किंमत ३५ ते ४० हजार रुपये आहे. 

 

रक्ताने माखल्यानंतरही पाच किमी चालवली सायकल; अपघातानंतरही पुन्हा ट्रॅकवर 
सायकलिंगही चरणजितची पॅशन बनली हाेती. त्यामुळेच यातच वेगळा ठसा उमटवण्यासाठी त्याने अहाेरात्र मेहनत घेतली. त्यामुळे त्याला १९९६ च्या दरम्यान प्रतिष्ठेच्या चाळीसगाव घाटाची सायकलिंग स्पर्धा एक, दाेन नव्हे, तब्बल १२ वेळा सलग जिंकता आली. त्यानंतर २००० मध्ये एका स्पर्धेदरम्यान त्याच्या सायकलला गंभीर अपघात झाला.ताे १०० फुट खाेल वेरूळच्या घाटात काेसळला. त्यामुळे बघणाऱ्यांच्या जीवाचा थरकाप उडाला. मात्र, तरीही क्ताने माखलेला चरणजित सिंग पुन्हा एकदा नव्या उमेदीने वरती आला. त्याने काही काळ विश्रांती घेतली. मात्र, या दुखापतीमधून सावरत ताे २००३ नंतर पुन्हा एकदा सायकलिंगच्या ट्रॅकवर परतला आहे.

 

बांबूच्या सायकलवरून विक्रमाचे टार्गेट साधणार 
बीएमआरची पात्रता २०० किमीचे अंतर ११ तासांची आहे. मात्र, आता याच विक्रमाला मागे टाकण्यासाठी चरणजितने कंबर कसली. यासाठी त्याने स्वत: बांबूपासून तयार केलेल्या सायकलवरून हा विक्रम करण्याचा निर्धार केला. याशिवाय त्याने हे २०० किमीचे अंतर या सायकलवरून ९ तासांत पूर्ण करण्याचा चंग बांधला. 

 

चार हजारांत पाच बांबूपासून तयार केली सायकल 
विदेशात बांबूची सायकल वापरणारांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अशाच प्रकारची सायकल तयार करण्याचा निर्धार चरणजित सिंगने केला. घरीच भरीव असे ओले पाच बांबू आणले. घरीच कटरने कापले. त्यानंतर त्याला सायकलचे काही पार्ट लावले. यातून ही सायकल तयार झाली. याला ४ हजारांचा खर्च आला. 

 

१४ व्या वर्षीच २१ किमी सायकलिंगमध्ये सुवर्णपदक 
चरणजितला बालपणीच सायकलिंगची आवड निर्माण झाली हाेती. यातच वेगळे करिअर करण्याचे ठरवले.१९९५ मध्ये त्याने २१ किमीच्या सायकल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले. त्याने हा पराक्रम वयाच्या १४ व्या वर्षी गाठला. यातूनच त्याच्या स्वप्नांना भरारी मिळाली अाहे. त्याने त्याने चारशे सायकल स्पर्धेत भाग घेतला आहे. 

 

बांबूच्या सायकलला आहेत १८ गिअर 
जिल्ह्यातून नॅशनल, इंटरनॅशनल सायकलपटू तयार व्हावे, याच विचाराने झपाटलेल्या चरणजित सिंग संघाने बांबूची सायकल तयार करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिका आणि केनिया या देशात बांबूच्या सायकलची क्रेझ आहे. विदेशी सायकल पन्नास हजार किमतीची असते बांबूची सायकल तीन ते पाच हजार रुपयांमध्ये बनवली आहे. या सायकलमध्ये १८ गिअर बसवले. यावरून एका तासात पंचवीस किलोमीटर गाठले जाते.