आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्नाटकातून जालन्यात आलेल्या वृद्धेचे हॉटेलवाल्यांकडून पोषण; हॉटेलचालक आणून देतात नाष्टा, नर्स घालतात अंघोळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- पती दररोज दारू पिऊन वाद करीत असल्याच्या त्रासाला कंटाळून येथील वृद्ध महिला जिल्हा रुग्णालयाच्या वाहनांच्या पार्किंगमध्ये येऊन थांबली आहे. एकाच जागी पडून असलेल्या वृद्ध महिलेसाठी परिसरातील हॉटेलचालक दररोज अन्न, अनेक समाजबांधव कपडे आणून त्यांना देतात. तसेच रुग्णालयातील काही नर्सेस त्या वृद्धेस दिवसाआड अंघोळ घालून सेवा करीत असल्यामुळे हे समाजबांधवच त्या पीडित महिलेचा 'आधार' झाल्या आहेत. सीता रामलू मालेशा (कर्नाटक) असे त्या वृद्ध महिलेचे नाव आहे. 

 

'जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे जे आपुले' या संत उक्तीप्रमाणे समाजातील दीनदुबळ्या, गोरगरीब, अनाथ, पीडितांची सेवा करून अनेक जण आपापल्या परीने सामाजिक बांधिलकी जोपासत असतात. कर्नाटकमधील एका छोट्याशा खेडेगावातून आलेल्या सीता मालेशा या वृद्ध महिलेने तिची आपबीती बोलून दाखवली. चार वर्षांपासून वाहनांच्या पार्किंगमध्ये राहत असलेल्या या महिलेकडे जिल्हा रुग्णालय, सामाजिक संस्थांसह, बेघर असलेल्यांसाठी निवारा तयार करण्यात आलेल्या नगरपालिकेचेही याकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. परराज्यातून पतीसोबत झालेल्या भांडणातून रागावून आलेली ही वृद्ध महिला अनेक समस्यांचा सामना करून जीवन जगत आहे. या महिलेचा जीवनप्रवास हा एक प्रकारे परिस्थितीने हताश झालेल्यांसाठी प्रेरणा देणारा ठरू लागला आहे. वृद्ध महिलेला थांबलेल्या ठिकाणच्या परिसरातील हॉटेलचालक, रुग्णालयातील कर्मचारी, नर्स यांच्यामुळे दररोज जेवण, चहा, नाष्टा मिळत आहे. कायमस्वरूपी कुठल्याच प्रकारचा निवारा या महिलेला मिळालेला नाही. वृद्ध महिला राहत असलेल्या परिसरात गवत होऊ नये म्हणून रुग्णालयातील कर्मचारी, नर्स या देखभाल ठेवत असतात. या देखभालीमुळे काही प्रमाणात का होईना या महिलेला मदत मिळत आहे. परंतु कायमस्वरूपी कुठलाच निवारा नसल्यामुळे ही महिला पाऊस, थंडी, उन्हाचा सामना करून जीवन जगत आहे. तिला पालिकेने कायमचा निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा जिल्हा शल्य चिकित्सक एम. के. राठोड यांनी व्यक्त केले. 

 

पालिकेने पुढाकार घ्यावा 
जिल्हा रुग्णालयातील नर्स, कर्मचारी हे या महिलेच्या परिसरात कागद, घाण झाल्यास त्या महिलेचे काळजी म्हणून साफसफाई ठेवतात. कायमस्वरूपी निवारा नसलेल्या या महिलेला आश्रय मिळण्यासाठी सामाजिक संस्था, नगरपालिकेने पुढाकार घेऊन निवारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...