Home | Business | Industries | Inspiring story of a man who chooses farming over govt job and becomes millionaire in 6 years

Inspiring: प्रत्येकाला हवी-हवीशी वाटणारी सरकारी नोकरी सोडून 6 वर्षांत बनले कोट्यधीश; वाचा एका शेतकऱ्याची यशोगाथा...

दिव्य मराठी वेब टीम | Update - Sep 06, 2018, 12:07 AM IST

प्रत्येकाला हवी-हवीशी वाटणारी सरकारी नोकरी सोडून शेतीच्या माध्यमातून कोट्यधीश बनलेल्या शेतकऱ्याची ही यशोगाथा आहे.

 • Inspiring story of a man who chooses farming over govt job and becomes millionaire in 6 years

  युटिलिटी डेस्क - सद्यस्थितीला युवकांना शेतात काम करणे आवडत नाही. सगळ्यांना मोठ्या शहरात नोकरी करायची आहे. तर काही जण असेही आहेत जे नोकरी सोडून गावात शेती आणि जोडधंदा करत आहेत. गुजरामधील जूनागढ येथील तुलशीदास लुनागरिया हे त्यापैकीच एक आहेत. ते केवळ 6 वर्षात कोट्याधीश झाले आहेत. त्यांनी केवळ एक नाही तर 4 व्यवसाय सुरु केले आहेत. जाणून घेऊ यात या व्यक्तीने कसे केले काम सुरु...


  नोकरी सोडून सुरु केला स्वत:चा व्यवसाय
  तुलसीदास लुनागरिया यांनी सांगितले की, जूनागढ येथील कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चरमधून अॅग्रीकल्चरल सायन्समध्ये पदवी घेतल्यानंतर त्यांनी नोकरीची तयारी सुरू केली. त्यानंतर त्यांना ग्रामीण बँकेत नोकरी लागली. ही नोकरी सरकारी होती. पण त्यांचे मन सरकारी नोकरीत लागत नव्हते. त्यांच्या लक्षात आले की आपण कोणतीही महत्वाकांक्षा न बाळगता आव्हान नसलेले नियमित काम आपण करत आहोत. त्यांनी स्वत:चे काय तरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 4 महिन्यानंतर नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केला.


  पुढील स्लाईडवर वाचा कशी केली यशस्वी उद्योगाची उभारणी...

 • Inspiring story of a man who chooses farming over govt job and becomes millionaire in 6 years

  एक-दोन नव्हे सुरु केले 4 बिझनेस
  - नोकरी सोडल्यावर तुलसीदास यांना अॅग्री सेंटर आणि अॅग्री बिझनेस योजनेविषयी माहिती समजली. त्यांनी एस अॅण्ड एसबीडीच्या दोन महिन्याच्या अभ्यासक्रमास प्रवेश घेतला. अहमदाबाद येथील इंटरनॅशनल स्कूल ऑफ पब्लिक लीडरशीप (आयएसपीएल) मधून त्यांनी ट्रेनिंग घेतले. ट्रेनिंग दरम्यान ते मार्केटिंग, अकाऊंटिंद आणि डीपीआर शिकले. याच काळात त्यांना अॅग्री बिझनेस एक्सपर्टला भेटण्याची संधी मिळाली.
  ट्रेनिंग समाप्त झाल्यावर त्यांनी स्वत:चे चार व्यवसाय सुरु केले.


  किती आहे कंपन्यांचा टर्नओव्हर?
  कॉटन सीड्स ऑयल एक्सप्लोरेशन आणि कॉटन सीड्स केक बनविणारी कंपनी अविरत कॉटन इंडस्ट्रीजचा वर्षाचा टर्नओवर 60 कोटी रुपये आहे. अडवेंता एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड वॉटर सॉल्यूएबल फर्टिलाइजर, प्लॅन्ट ग्रोथ प्रोमोटर आणि सॉईल कंडिशनर सारखे पोटैसियम ह्यूमेट, फूलविक एसिड्सचा देशभर सप्लाय करते. यासोबतच अॅग्रो कमोडिटीज जसे की रॉ कॉटन बेल्स, मसाले, फळे आणि भाजी एक्सपोर्ट करते. कंपनीचा वर्षाचा टर्नओव्हर 2 कोटी रुपये आहे. याशिवाय रेनो अॅग्री-जेनेटिक्स प्रायव्हेट लिमिटेडचा टर्नओव्हर 5 कोटी आणि विमैक्स कॉर्प सायन्स लिमिटेडचा टर्नओव्हर 28 कोटी रुपये आहे. चार कंपन्यांचा एकूण टर्नओव्हर 95 कोटी रुपये आहे.

 • Inspiring story of a man who chooses farming over govt job and becomes millionaire in 6 years

  8 राज्यांत व्यवसाय
  - तुलसीदास यांचे म्हणणे आहे की, त्याचा व्यवसाय 8 राज्यात पसरलेला आहे. यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल या राज्यांचा समावेश आहे. विमैक्स कॉर्प सायन्स अॅग्रीकेमिकल्सची निर्मिती आणि मार्केटिग करते. अॅग्री केमिकल्समध्ये इंसेक्टिसाइड्स, फंगीसाइड्स, विडीसाइड्स, प्लॅन्ट ग्रोथ रेगुलेटर्स आणि मायक्रो नूट्रीएंट्स सोबत ऑर्गेनिक पेस्टिसाइट्स बनवते.

   

  120 जणांना दिला रोजगार
  त्यांच्या व्यवसायामुळे सुमारे 120 जणांना रोजगार मिळाला आहे. त्यांनी एक लाख शेतकऱ्यांपर्यत पोहचण्याचा निर्धार केला असून त्यादिशेन ते वाटचाल करत आहेत.

Trending