Home | Maharashtra | Mumbai | Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary

Inspiring: भजी विकली, पेट्रोल पंपावर काम केले; धीरुभाई अंबानी असे बनले 'पॉलिस्टर किंग'

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 28, 2018, 10:15 AM IST

धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते, इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- धीरूभाईंसोबत मुकेश व अनिल अंबानी

  मुंबई- देशातील आघाडीचे उद्योजक राहिलेले धीरजलाल ऊर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी यांचा आज जन्मदिवस आहे. 28 डिसेंबर 1932 रोजी धीरुभाईंचा जन्म गुजरात राज्यातील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाड गावी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या.

  धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. धीरूभाई शिक्षणात सर्वसामान्य विद्यार्थी होते. त्यांचे इंग्रजीचे ज्ञान चांगले तर गणित कच्चे होते. 1949 मध्ये आपले 10 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून धीरूभाई नोकरीच्या शोधात एडन येथे गेले. तेथे बर्मा शेल कंपनीची उपकंपनी म्हणून काम करणाऱ्या ए.बेस नावाच्या कंपनीत धीरूभाई मासिक 300 रुपये पगारावर पेट्रोल पंपावर नोकरी केली. ही कंपनी छोट्या मोठ्या अनेक उद्योगांमध्ये कार्यरत होती. आंतरराष्ट्रीय कंपनीचा भाग असल्याने तेथे अनेक देशांचे व्यापारी येत असत.

  धीरूभाई यांनी तिथेच स्वतःची रिफायनरी स्थापन करावी, असे स्वप्न पाहण्यास सुरूवात केली आणि आज त्यांची स्वत:ची सगळ्यात मोठी खासगी रिफायनरी आहे. पुढे धीरूभाई यांनी व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. 1977 साली सार्वजनिक घोषित केलेल्या रिलायन्स कंपनीचा देशासह विदेशात विस्तार झाला आहे. धीरुभाईंच्या जीवनावर 'गुरु' हा सिनेमा बनवण्यात आला आहे.

  पुढील स्लाईडवर वाचा, भजी विक्री हा धीरुभाई अंबानींचा पहिला व्यवसाय...

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींसोबत डिनर घेतात धीरूभाई अंबानी

  धीरूभाईंचा जन्म 28 डिसेंबरला 1932 मध्ये गुजरातमधील सौराष्ट्रच्या जुनागढ जिल्ह्यातील चोरवाडमधील कुकसवाडा या गावी झाला. त्यांचे वडील हिराचंद गोवर्धनदास अंबानी हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते तर आई जमनाबेन या गृहिणी होत्या. धीरूभाई हे आपल्या पाच भावंडातले मधले अपत्य. धीरुभाईंना लहानपणी शिक्षणासोबत पैसा कमावण्यात जास्त कल होता. ते अधूनमधून शाळेला दांडी मारत. शहरातून फेरफटका मारुन पैसा कमावणार्‍या लोकांना पाहात.

   

  विद्यार्थीदशेतच धीरुभाईंनी व्यवसाय सुरु केला. भजी विक्री हा धीरुभाईंचा पहिला व्यवसाय. शनिवार व रविवारी ते गिरनार पर्वतावर जाणार्‍या पर्यटकांना भजी विकत व त्यातून पैसे कमावत.

   

  पुढील स्लाइडवर वाचा, थोड्या दिवसात अंबानी बंधु झाले लोकप्रिय

   

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- धीरूभाई अंबानी व कोकिळाबेन अंबानी यांच्यासोबत मुकेश व अनिल अंबानी

  धीरूभाई त्यांचे वडीलबंधु रमणिकलाल यांच्यासह एडन मध्ये राहत. गुजराती लोकांची आवडनिवड या दोघा भावांना माहीत असल्याने त्यांनी गुजराती खाद्यपदार्थ भारतातून मागवून ते पदार्थ एडनला विकण्यास सुरू केले. थोड्याच दिवसात अंबाणी बंधु लोकप्रिय होऊ लागले. यामुळे ओळखी वाढत गेल्याच पण व्यापारी धीरूभाईंनी प्रत्येकाकडून काहीतरी माहिती मिळत गेली. धंद्याचे गणित मांडता येऊ लागले. आपल्या हुशारी, मेहनत, चिकाटी या गुणांच्या जोरावर धीरूभाई ए.बेस मध्ये कारकून ते सेल्स मॅनेजर या पायऱ्या ओलांडून गेले. आपल्या कामापुरते अरबी भाषेवर प्रभुत्वही धीरूभाईंनी मिळविले होतेच, अनेक मित्रही जोडले. या मित्र परिवारत भारतीय आणि परदेशी असे सगळेच होत. त्यातील सुशीलभाई कोठारी, नटुभाई संघवी आणि हरकिसन पारेख हे पुढे रिलायन्सचे मुख्य मार्गदर्शक, आधारस्तंभच बनले.


  यमनचे नाणे चांदीची होते. धीरुभाईंनी चांदीची नाणी जमा करण्यास सुरुवात केली. नंतर नाणी वितळवून ते व्यापार्‍यांना विकली. धीरुभाईंनी त्यातून लाखों रुपये कमावले. नंतर ते भारतात परतले.

   

  पुढील स्लाइडवर वाचा, 15 हजार रुपयांपासून सुरु केली कंपनी...

   

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- धीरूभाई अंबानीसोबत मुकेश व अनिल अंबानी

  1958 मध्ये 50 हजार रुपये गुंतवून धीरुभाईंनी पॉलीस्टर दोर्‍याची आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरु केला. त्यातील 15 हजार रुपयांची गुंतवणूक करून रिलान्यस कमर्शियल कॉर्पोरेशनची पायाभरणी केली. आशियात या दिवसांत पॉलीस्टरची प्रचंड मागणी होती. धीरुभाईंनी या काळात प्रचंड पैसा कमावला. पत्नी कोकिलाबेन व मुलांसोबत धीरुभाई एक बेडरुमच्या फ्लॅटमध्ये राहीले.

   

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- धीरूभाई अंबानींसोबत कोकिळाबेन अंबानी

  आयपीओ आला बाजारात-


  1966 मध्ये नरोद्यात टेक्सटाइल कंपनीची स्थापना केली. 1969-70 मध्ये त्यांनी स्वत:चा विमल ब्रँड बाजारात उतरवला. 1977 मध्ये त्यांना मोठे यश गवसले. 58 हजार गुंतवणूकदारांच्या बळावर रिलान्यसचा आयपीओ बाजारात आला. आपली हुशारी, परिश्रम व चिकाटीच्या जोरावर धीरूभाईंनी टेक्सटाइल व पेट्रोकेमिकल व्यापाराचे साम्राज्य उभे केले.

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- धीरूभाई अंबानी आपल्या कुटुंबियांसोबत

  बॉम्बे डाईंगकडून मिळाले आव्हान...


  धीरूभाई अंबानी आपल्या गुंतवणुकदारांची विशेष काळजी घेत होते. 1986 मध्ये झालेल्या मीटिंगला 30 हजार शेअरहोल्डर सहभागी झाले होते. या काळात बॉम्बे डाईंगने या क्षेत्रात पाऊल ठेवले.

  धीरूभाई यांच्यावर लिखित पुस्तक 'द पॉलिस्टर प्रिन्स' मध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. जुलै 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले.

 • Inspiring Story Of Dhirubhai Ambani On His Birth anniversary
  फाइल फोटो- अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष बिल किल्टंन यांच्यासोबत धीरूभाई अंबानी, मुकेश व अनिल अंबानी

  मुलांनी स्विकारली जबाबदारी...


  धीरूभाई यांच्या पच्छात त्यांचे चिरंजिव मुकेश व अनिल अंबानी या दोगांनी रिलान्यस उद्योग समुहाची जबाबदारी स्विकारली. मुकेश यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजने नेतृत्त्व करत आहे तर अनिल यांनी रिलायन्स कम्युनिकेशन व रिलायन्स एनर्जीचे मालक आहेत.

Trending