आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Inspiring Story Of Man Selling Beauty Products Made From Cow Dung Becomes Millionaire

Inspiring: शेणापासून कोट्यधीश बनला हा उद्योजक; 13 देशांमध्ये व्यवसाय, 5 कोटींची वार्षिक उलाढाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - गायीचे तूप, दुध आरोग्यासाठी चांगले असल्याचे सर्वश्रूत आहे. शेणापासून बायोगॅस निर्मितीबद्दलही तुम्ही ऐकलाच असाल. परंतु, याच शेण आणि गोमूत्रापासून सौंदर्य प्रसाधने, साबण तयार करून ही व्यक्ती कोट्यधीश बनली आहे. आम्ही तुम्हाला अशा एका व्यापाऱ्याबद्दल सांगत आहोत की ज्याने शेणाचा वापर करुन कोट्यावधी रुपये कमवले आहेत. मुंबईत असलेली त्यांची कंपनी गायींच्या शेण आणि गोमूत्रापासून साबण, टूथपेस्ट, क्रीम, फेस वॉश आणि अन्य कॉस्मॅटिक प्रॉडक्ट बनवते.


शेण-गोमूत्रापासून बनवतात प्रॉडक्ट
काऊपॅथीचे फाउंडर उमेश सोनी यांनी दिव्य मराठीला सांगितले की, शेणात आणि गोमूत्रात आजाराशी लढण्याचे अनेक गुण आहेत. आयुर्वेदात पंचगाव्य म्हणजे गोमूत्र, गायीचे शेण, दूध, दही आणि तूप याद्वारे आजारांवर उपायांचा उल्लेख आहे. या सगळ्याच विचार करुन त्यांनी शेण आणि गोमूत्रापासून साबण बनविण्यास सुरुवात केली. हळूहळू लोकांना कळल्यावर या वस्तूंना मागणी वाढली. त्यामुळे बिझनेसही वाढला.

 

10 लाख रुपयांपासून सुरुवात
सोनी यांनी सांगितले की, वर्ष 2012 मध्ये लाख रुपयांची गुंतवणूक करुन त्यांनी ही कंपनी सुरु केली. ही रक्कम त्यांना एक्सपोर्टच्या बिझनेसमधुन मिळालेल्या फायद्याची होती. काऊपॅथी सुरु करण्यापूर्वी त्यांनी एका मित्रासोबत एक्सपोर्टचा व्यवसाय सुरु केला होता. याअंतर्गत ते कॉस्मेटिक प्रोडक्ट्स एक्सपोर्ट करत होते. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, आणखी सविस्तर माहिती...

बातम्या आणखी आहेत...