आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉन्सटेबल ते IPS अशी आहे या अधिकाऱ्याची कहाणी, इनकमटॅक्समध्येही झाले होते सिलेक्शन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

झुंझुनू - राजस्थानमझील झुंझुनूचे IPS अधिकारी विजय गुर्जर यांचा कॉन्स्टेबल ते आयपीएस अधिकारी पदापर्यंतचा प्रवास सुन्न करणारा आहे. प्रत्येकाच्या जीवनाला प्रेरणा मिळेल अशी यांची कहाणी आहे. इनकम टॅक्समध्ये त्यांचे सिलेक्शन झाले होते. पण आयपीएल बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी ती संधी सोडली. 


10वीत फक्त 55 टक्के 
- 10वीमध्ये विजय यांना फक्त 55 टक्के मिळाले होते. 12 वीत त्यांनी 67 टक्के मिळवले. त्यानंतर ते नोकरीच्या शोधात होते. तयारी सुरू केली तेव्हा जून 2010 मध्ये दिल्ली पोलिसांत कॉन्सटेबल पदावर त्यांची निवड झाली. 
- दिल्लीला जऊन आयपीएस अधिकारी पदाबाबत समजले तेव्हा त्यांनी आयपीएस बनण्याचा निर्धार केला. 


डिसेंबरमध्ये बनले फौजदार 
- शिक्षणासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते त्यामुळे त्यांनी आधी फौजदार पदाची तयारी केली. डिसेंबर 2010 मध्ये त्यांची फौजदारपदी निवडही झाली. 
- या पदावर काम करताना त्यांना अभ्यासासाठी वेळ मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एसएससीची तयारी सुरू केली. त्यांची निवड सेंट्रल एक्साइजमध्ये झाली. केरळच्या त्रिवेंद्रममध्ये पोस्टींग झाली. 
- स्पर्धा परीक्षांची तयारी दिल्लीत करत होते त्यामुळे त्रिवेंद्रमला गेल्याने त्यांच्या अभ्यासावर परिणाम होऊ लागला. 

 
इनकम टॅक्समध्येही सिलेक्शन 
- त्यांनी पुन्हा एकदा एसएससीची परीक्षा दिली. यावेळी त्यांची निवड इनकम टॅक्स विभागात झाली. नियुक्ती झाली दिल्लीत. 
- इनकम टॅक्सच्या नोकरीबरोबर ते परिक्षांची तयारी करत राहिले. 2016 मध्ये तिसऱ्यांदा परीक्षा दिली.
- मुलाखतीपर्यंत पोहोचले पण 8 गुण कमी मिळाल्याने सिलेक्शन होऊ शकले नाही. 

 
हार मानली नाही 
- एवढ्या चढ उतारानंतरही विजय यांनी हार मानली नाही. ते 8-10 तास अभ्यास करत राहिले. 
- 5 व्या प्रयत्नात 2018 मध्ये आयपीएसमध्ये त्यांचे सिलेक्शन झाले. 
- आय ते आयपीएस अधिकारी आहेत. ते आता पत्नीकडूनही स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...